अमेरिकन जावयाच्या अंगावर सोलापुरी चादर !

पॉपस्टार निक जोनास : अमेरिकन जावयाच्या अंगावर सोलापुरी चादर !

मुंबई : सोलापूरच्या पारंपरिक जेकार्ड चादरीची तसे पाहिल्यास जगभर ख्याती. सोलापुरी चादरीची वैशिष्ट्ये ही की,

आकर्षक डिझाईन, जाडसर, प्युअर कॉटन, ऊबदार, टिकाऊपणा. परंतु, या चादरीचे इतर राज्यांतून डुप्लिकेशन सुरू

होऊन सोलापुरी चादरीला फटका बसला आहे. सोलापूरची चादर पांघरूण घेण्यासाठी उपयोगी आहे, असे म्हटले जाते. मात्र,

त्याचा आकर्षक फॅशनेबल शर्टही शिवून घेतला जाऊ शकतो, हे कोणाच्या मनातही आलं नसेल. मात्र चादरीपासून फॅशनेबल

शर्ट शिवला जातो व तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो, हे सिद्ध केलंय अमेरिकन पॉपस्टार निक जोनास (Popstar Nick Jonas)याने.

पॉपस्टार निक जोनास : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनासने!

निक जोनासने (Popstar Nick Jonas)सेंट लुईसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हा सोलापुरी जेकार्ड चादरीचा शर्ट घालून

सहभागी झाला होता व त्याने “या कपड्यांनी ऊब दिली’ असे म्हणत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यामुळे सोलापुरी

चादर पुन्हा एकदा जगात चर्चेचा विषय ठरली आहे. ही चादर सोलापुरातील चाटला टेक्‍स्टाईल इंडस्टीमध्ये तयार झाली असून,

निकच्या या चादरीच्या शर्टाच्या बाहींवर “चाटला आर’ हा ट्रेडमार्क लिहिलेला दिसून येतो.

विशेष म्हणजे, चाटला टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीजचे मालक गोवर्धन चाटला यांनाही त्यांच्या फॅक्‍टरीमधून तयार झालेल्या चादरपासून

शर्ट तयार झाल्याचा व तोही अमेरिकन पॉप सिंगर निक जोनासने तो घातलेला पाहून आश्‍चर्य वाटले. मात्र यामुळे सोलापुरी

चादरीची कीर्ती आता फॅशनेबल शर्टाच्या माध्यमातून सातासमुद्रापर्यंत पोहंचली आहे.

Social Media