रोहित पठारे हत्येचा तपास IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील SIT मार्फत करा, तपास पथकात वैजापूर बाहेरचे अधिकारी व महिला अधिकार नियुक्त करा

रोहित पठारे हत्येचा तपास :  IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील SIT मार्फत करा, तपास पथकात वैजापूर बाहेरचे अधिकारी व महिला अधिकार नियुक्त करा: हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई/ संभाजीनगर, : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचा मागास वर्गीय समाजातील तरुण

रोहित पठारे(Rohit Pathare ) याची  हत्या ही अत्यंत गंभीर घटना आहे. भाजपाच्या राजवटीत दलित

मागासवर्गीय समाज सुरक्षित नाही असे या  घटनेवरून दिसत आहे. पोलिसांचे गुन्हेगारांना भय राहिलेले नाही,

गृहविभागावर देवेंद्र फडणवीस यांची पकड नाही म्हणून पठारे सारख्या हत्या सातत्याने होत आहेत.

रोहित पठारे हत्येचा तपास समाधानकारक नाही, त्यामुळे सध्याची एसआयटी रद्द करून IPS अधिकाऱ्याच्या

SIT मार्फत तपास करा, तपास पथकात वैजापूर बाहेरचे अधिकारी व महिला अधिकारी नियुक्त करा,

अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harshvardhan Sapkal) यांनी केली आहे.

रोहित पठारे हत्येचा तपास :  रोहित पठारे हत्येने कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली, भाजपा सरकारच्या राज्यात मागासवर्गीय समाज असुरक्षित.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रोहित पठारेच्या कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी

त्यांच्यासोबत खासदार कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण डोणगावकर,

राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना

ते पुढे म्हणाले की, राज्यातील खराब कायदा व सुव्यवस्थेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत.

रोहित पठारेची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे. पठारेची हत्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच विकृत पद्धतीने केली आहे. मराठवाड्यात व राज्यात अशा पद्धतीने

होणाऱ्या हत्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. गुंडांची हिम्मत कशी होते, अशा

विकृत्त पद्धतीने वागण्याची. राज्यात पोलीस नावाची यंत्रणा राहिलेली नाही, गुंडांना पोलिसांचे भय राहिलेले नाही.

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याप्रमाणे पोलिसांचे वर्तन नसून महाराष्ट्र पोलीस खल प्रवृत्तीचे रक्षण

करत आहेत, असेच या घटना पाहता दिसत आहे.

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली रोहित पठारेच्या कुटुंबियांची भेट, स्थानिक पोलिसांचा तपास संशयास्पद.

सपकाळ पुढे म्हणाले की, रोहित पठारे हत्याप्रकणातील आरोपी गजाआड झाले असले तरी कुटुंबाने दिलेली

माहिती व स्थानिक पोलिसांनी केलेली कारवाई यात कुठेही साधर्म्य आढळून येत नाही, तपास योग्य मार्गाने

होत नाही. घटनेवेळी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, स्थानिक पोलीसांच्या

तपासावर पठारे कुटुंब समाधानी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून

तत्काळ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटी गठीत करावी, परिवाराला तपासाबाबत अवगत

करावे आणि पठारे कुटुंबाच्या शंकांचे समाधान करावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

Published by – SanvadMedia

Social Media