Monsoon-Session : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलैदरम्यान
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे (State-Legislature) पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असून, विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विधानभवन येथे झालेल्या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे,(Ram-Shinde) विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,(Adv. Rahul Narwekar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra-Fadnavis,)उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath-Shinde) उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,(Sunetra Ajit Pawar) विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे(Anna Bansode) उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील,(Chandrakant-dada-Patil,) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan-Bhujbal)यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Monsoon-Session)
बैठकीत अधिवेशनाचा कालावधी, कामकाजाचे स्वरूप, शासकीय विधेयके तसेच विविध विभागांशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्न, विकासकामे, पावसाळी परिस्थिती, प्रशासनाशी संबंधित मुद्दे तसेच जनहिताच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असून, राज्याच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.