Minister-of-State-Ramdas-Athawale : तृणमुल कॉग्रेसच्या उर्वरित खासदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
मुंबई : तृणमुल कॉग्रेसच्या 20 खासदारांनी ममता बॅनर्जींचे (Mamata-Banerjee) नेतृत्व झुगारुन नॅशनलिस्ट सिटीझन (Nationalist-Citizen)पार्टी ऑफ इंडिया या त्रिपुरातील पक्षात प्रवेश केला आहे. तृणमूल चे खासदार जर बंड करणार आहेत, असे मला कळले असते तर ते सर्व खासदार माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष असणा-या रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन मी केले असते. 20 खासदारांनी तृणमुल कॉग्रेस सोडला आहे. उर्वरित तृणमुल कॉग्रेसच्या खासदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले (Ramdas-Athawale) यांनी आज मुंबईत केले.
पश्चिम बंगालमधील तृणमुल कॉग्रेसच्या 60 आमदारांनी सुध्दा ममता बॅनर्जींचे(Mamata-Banerjee) नेतृत्व झुगारुन बंड केले आहे. ते वेगळा गट चालवित आहेत. तृणमुल कॉग्रेस विरुध्द बंडखोरी केलेल्या तृणमुल कॉग्रेसच्या आमदारांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb-Ambedkar)पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षात यावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी आज केले आहे. (Minister-of-State-Ramdas-Athawale)
पश्चिम बंगालमधील तृणमुल कॉग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाच्या दबावामुळे तृणमुल कॉग्रेसमधुन खासदार बंड करण्यास धजावत नव्हते. मात्र आता ममता बॅनर्जी यांची सत्ता गेल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला कंटाळलेल्या तृणमुल कॉग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी तृणमुल कॉग्रेस आणि ममता बॅनर्जी (Mamata-Banerjee) यांचे नेतृत्व नाकारले आहे. त्यांनी 20 खासदारांचा स्वतंत्र गट करुन बहुमताने तृणमुल कॉग्रेसच्या खासदारांनी त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र तृणमुल कॉग्रेसच्या उर्वरित खासदार आणि आमदार यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.