Kirti-Kulhari : कीर्ती कुल्हारी, बॉलिवूड(Bollywood) आणि ओटीटीमधील एक लोकप्रिय चेहरा, सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती कुल्हारीच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कीर्तीने ‘हाऊस हेल्प’ अर्थात ज्या महिला घरकाम करतात आणि मुंबईत जेवण बनवायला येतात त्यांच्या मानधनावर भाष्य केले आहे.
कीर्ती कुल्हारी यांनी एका व्हिडीओमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर घरकामगारांच्या वेतनाबाबत आणि हक्काबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट आणि अभिनेत्री(actress) मिनी माथूरने कीर्तीच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत तिची खरडपट्टी काढली आहे.
काय म्हणाली कीर्ती कुल्हारी? (Kirti-Kulhari)
मुलाखतीत कीर्तीने मुंबईतील यारी रोड भागातील तिच्या नवीन घरात शिफ्ट होण्याचा तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “मी नुकतीच यारी रोड येथील एका नवीन घरात राहायला गेले. तिथे कामावर आलेल्या महिलांशी मी बोलले, तेव्हा त्यांनी सांगितलेला मोबदला ऐकून मला धक्काच बसला. ही महिला दररोज दोन तास काम करण्यासाठी 10 हजार रुपये मागत होती.
मला वाटले की, भांडी घासणे आणि लादी पुसणे,कपडे धुणे ही सर्व कामे येत असेल.” कीर्ती पुढे म्हणाली, ‘ती फक्त दोन तासांसाठी येईल आणि ती तिच्या हिशोबाने काम करणार… तर 10,000 रुपये का मागत आहे?
त्यावेळी आम्हाला वाटले की आमचा चेहरा (सेलिब्रेटी चेहरा) पाहून ते इतके पैसे तर मागत नाहीत ना? कदाचित त्यांना वाटत असेल की त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, चला थोडे अधिक मागूया.असं काहीसं असेल.
कीर्तीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली, अनेकांनी तिच्यावर टीका केली तर काहींनी तिची बाजूही घेतली.
मिनी माथूरने सत्य सांगितले
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्ससह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर टीका केली. या व्हिडिओवर कमेंट करताना अभिनेत्री मिनी माथूरने थेट कीर्तीला फटकारले आहे. जरा विचार करा, ते दोन तास आपल्याला आपल्या आयुष्यातील दोन तास देतात, ज्यातून आपण कितीतरी पटीने अधिक कमवू शकतो. हा मोबदला जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत ‘किमान वेतना’पेक्षा खूपच कमी आहे.
मिनी माथुर व्यतिरिक्त, इतर अनेकांनी कीर्तीच्या कंजूषपणावर आणि तिच्या विचारसरणीवर आक्षेप घेतला आहे. विवेक समतानी म्हणाले की ते तासाला 2 डॉलरपेक्षा कमी आहे, आणि ते खूप जास्त वाटत नाही? आश्चर्य!