“अधूनमधून उपवास, केटो आणि क्रॅश डाएट वजन कमी करण्यात खरंच मदत करतात का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत”

Keto-and-Crash-Diet : आजकाल वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग, केटो आणि क्रॅश डाएटचा ट्रेंड आहे, पण ते खरंच प्रभावी आहेत का? डॉक्टरांकडून जाणून घ्या. भारतातील वाढती लठ्ठपणाची समस्या चिंताजनक आहे. जीवनशैलीतील बदल म्हणून याकडे दुर्लक्ष केले जात असले, तरी ते आजाराचे स्वरूप धारण करत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण – 5 (2019-21) नुसार, भारतातील जवळपास एक चतुर्थांश प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहेत. ही आकडेवारी राज्यानुसार आणि ग्रामीण-शहरीनुसार बदलते, जी ८% ते ५०% पर्यंत आढळते. लठ्ठ झाल्यावर लोक वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग, केटोजेनिक डाएट आणि क्रॅश डाएटसारखे अनेक प्रयत्न करतात. परंतु, हे उपाय कितपत प्रभावी आहेत? याबद्दल डॉ. आशिष गौतम (मुख्य संचालक, रोबोटिक (Robotic) आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, (laparoscopic surgery) मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पटपरगंज, नवी दिल्ली) यांचे मत जाणून घेऊयात.

अधूनमधून उपवास म्हणजे काय?

डॉ. आशिष गौतम सांगतात, intermittent fasting मध्ये ठराविक तास किंवा दिवस अन्न मर्यादित ठेवले जाते. उदाहरणार्थ, दररोज आठ तास उपवास करणे किंवा एक दिवस उपवास करणे. वजन कमी होणे हे कॅलरी नियंत्रणामुळे होते, metabolic effect मुळे नव्हे. काही अभ्यासांनुसार, यामुळे वजन घटते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते, परंतु ते सामान्य कॅलरी-नियंत्रित आहाराप्रमाणेच असते.
या पद्धतीतील टिकाऊपणा हा चिंतेचा विषय आहे. उपवास करताना थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो, तसेच अनेकजण गरजेपेक्षा जास्त खातात. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास केल्यास रक्तातील साखर घटू शकते, विशेषतः इन्सुलिन किंवा सल्फोनील्युरिया घेत असल्यास धोका संभवतो. अनियमित वेळापत्रक असणाऱ्या किंवा अधिक शारीरिक श्रमाची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींना दीर्घकाळ उपवास करणे कठीण आहे.

केटोजेनिक आहार(Keto Diet)- (Keto-and-Crash-Diet)

केटोजेनिक डाएटमध्ये कमी कार्ब आणि जास्त फॅट असल्याने शरीर ऊर्जेसाठी चरबी वापरते. यामुळे वजन लवकर घटते, कारण पाणी आणि ग्लायकोजेन कमी होते. भूक कमी होणे आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारणे हे फायदे असले तरी, भारतात हा आहार घेणे कठीण आहे, कारण भारतीय आहारात धान्य, फळे आणि कडधान्ये अधिक असतात. तसेच, जास्त फॅटमुळे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढण्याची शक्यता असते. ICMR च्या संशोधनानुसार, भारतातील पाचपैकी एका प्रौढ व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा आहार घेतल्यास बद्धकोष्ठता, पोषक तत्वांची कमतरता, स्नायू कमी होणे आणि पुन्हा वजन वाढणे अशा समस्या येऊ शकतात.

क्रॅश डाएट(Crash Diet)-

वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएटचा अवलंब करणे धोकादायक आहे. हे डाएट काही आठवड्यांत जलद वजन घटवण्याचे आश्वासन देतात, पण यात दररोज ८०० पेक्षा कमी कॅलरीज घेतल्या जातात. यामुळे शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी चयापचय कमी करते आणि स्नायू कमजोर होतात. सुरुवातीला वजन कमी होते, पण ते पाणी आणि स्नायूंच्या ऱ्हासाने होते, चरबीमुळे नाही. तसेच, संप्रेरकांतील बदलांमुळे भूक वाढते आणि पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते. वारंवार क्रॅश डाएट केल्याने वजन वाढणे, कुपोषण, केस गळणे, मासिक पाळीत अनियमितता आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

डॉ. आशिष गौतम यांच्या मते, भारतीयांमध्ये पोटाच्या लठ्ठपणाची समस्या मोठी आहे, ज्यामुळे मधुमेह, हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. फॅड आहाराने शरीराच्या विशिष्ट भागातील चरबी कमी करता येत नाही. उलट, यामुळे स्नायू कमी होऊन चयापचय मंदावते आणि अशक्तपणा येतो. पुरेसे प्रथिने न घेणे किंवा नियमित व्यायाम न करणे, स्नायू टिकवण्यासाठी आवश्यक आहे.
या गोष्टींकडे लक्ष द्या-

Social Media