Women-Safety : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट
Women-Safety : भाजपचा भक्तसंप्रदाय बंगाल हातात आल्याबद्दल उन्माद करतोय. भारताची वीण उसवण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (Devendra-Fadnavis) यांनी निकालानंतर झालमुरीचा आस्वाद घेतला. ते इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar-Maharaj) कन्येच्या लग्नालाही मंत्रीमंडळासह सहकाऱ्यांसह उपस्थित होते. मंत्रीमंडळाची बैठक ही मुंबई येथे त्यांच्या उपस्थितीत पार पडली.
या सर्व जल्लोषात नसरापूरच्या ३ वर्षांच्या चिमुकलीला न्याय कधी आणि कसा मिळेल या वर कोणी काही बोलले का ? त्यानंतर कालची ९ वर्षांच्या मुलीची पुण्यातील घटना, अकोल्यातील पाचूर तालुक्यात १० वर्षीय मुलीवर झालेली अत्याचाराची घटना. पालघर (Palghar) मध्ये भोंदूबाबाने अघोरी पुजासाठी बोलवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला.
खरात, ऋषीकेश वैद्य, (Rishikesh-Vaidya,) व इतर ढोंगी बुवाबाबांनी महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना, यांसारख्या बातम्या आता रोजच येत आहेत. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच कायद्याची भीती राहीली नाही. दुष्कृत्य करणाऱ्यांच्या मनात ‘काहीही होणार नाही’ हा विश्वास निर्माण करण्यात फडणवीस यशस्वी झालेत.
नारी शक्ती ला वंदन हे फक्त विरोधी पक्षाविरुद्ध फेक नरेटीव सेट करायला, महाराष्ट्राच्या लेकीबाळींच्या सुरक्षिततेसाठी यांच्याकडे वेळ नाही. महिलांना खरा सन्मान मिळवून देण्यात यांचा काही वाटा नाही, पण महिलांना सुरक्षित वातावरण मिळू नये, हे श्रेय यांचेच!