Vidhansabha-Comentry:विधानसभा समालोचन दि. ११ डिसें,२०२५

Vidhansabha-Comentry : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कामकाज दोन सत्रांत पार पडले.

सकाळी ९.४५ वाजता विशेष बैठकीने दिवसाची सुरुवात झाली.

या बैठकीत नियम २९३ अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा घेण्यात आली.

यानंतर प्रश्नोत्तरे व लक्षवेधी सूचनांचे कामकाज झाले. याशिवाय सन २०२५–२६ च्या

पुरवणी मागण्यांवर महसूल, कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा घेण्यात आल्या.

सायंकाळी साडेपाच वाजता चर्चारोधानुसार मतदान घेऊन या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

शेतकरी धोरणाविरोधात विरोधकांनी केलेला सभात्याग तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आलेला गुणगौरव, ही आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये ठरली.

विशेष बैठक : शेतकरी प्रश्नांवर सत्ताधारी- विरोधकांमध्ये चर्चा(Vidhansabha-Comentry)

विशेष बैठकीच्या सुरुवातीला शेतकरी प्रश्न, नैसर्गिक शेती तसेच अतिवृष्टीमुळे

राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीतील नुकसानीबाबत सत्ताधारी सदस्यांचा प्रस्ताव चर्चेसाठी घेण्यात आला.

भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारला घरचा आहेर देत कृषी क्षेत्राबाबत ठोस

धोरण नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असल्याची टीका केली.

मदत पॅकेज चुकीच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याने गरजू शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत

नसल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अचानक बदलून नव्या अटी लागू केल्याने

प्रयोगशील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी गंभीर चर्चा सुरू असताना संबंधित खात्यांचे सचिव व मंत्री सभागृहात

अनुपस्थित राहत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, कृषी, सहकार, महसूल,

वन तसेच वित्त विभागांचे मंत्री उपस्थित राहणे अपेक्षित असताना एकच मंत्री सभागृहात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री उपस्थित झाल्यानंतरच चर्चा सुरू

करण्याची मागणी केली. यावर पिठासीन तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी मंत्री येत असल्याची माहिती देत कामकाज

सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. कोकणातील शेतकरी सरकारी अनास्था व चुकीच्या धोरणांचा

बळी ठरत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला.

हापूस आंब्याच्या दर्जाबाबत बोलताना, बलसाड हापूसला दर्जा देताना कोकणातील मूळ हापूस उत्पादकांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

त्यानंतर वेळ संपल्याने विशेष बैठकीचे कामकाज स्थगित करण्यात आले.

प्रश्नोत्तरांचा तास : नाफेड, कापूस आणि सोयाबीन खरेदीवर गदारोळ

सकाळी अकरा वाजता नियमित बैठकीत राज्यात नाफेडच्या केंद्रावर शेतमालाला योग्य भाव मिळत

नसल्याबाबत संतोष दानवे आणि अन्य सदस्यांचा तारांकीत प्रश्न होता.

कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी संतप्त स्वरात सरकारच्या अनास्था आणि चुकीच्या धोरणावर टिका केली.

यावेळी त्यांना सत्ताधारी सदस्यांकडून अडथळे आणायचा प्रयत्न झाला.

त्यावर त्यांनी ज्याला आगीची झळ लागते त्यांचे दु:ख कधीतरी समजून घ्या अश्या शब्दात सदस्यांना समज दिली.

कापूस खरेदी सुरू आहे की शेतक-याची थ ट्टा सुरू आहे असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की सरकार

आणि मंत्री यांनी खरेदी केंद्रावर भेट देवून तेथे काय चालते हे डोळ उघडून बघावे.

मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सरका कडून सोयाबीन आणि कपास खरेदी साठी केंद्र सुरू असून

कोणत्याही प्रकारे बारदाना कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.

यावेळी प्रकाश सोळंके, नाना पटोले अर्जून खोतकर आदी सदस्यांनी प्रश्न विचारले.

मंत्री जयकुमार रावल यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान होत नव्हते. त्यावेळी अध्यक्ष राहूल नार्वेकर

यांनी हा प्रश्न सुमारे २५ मनिटे चर्चा केली तरी सुटण्यासारखा नसल्याचे सांगत दुपारी दालनात

बैठक घेवून संबंधित सदस्यांचे प्रश्न सोडविणार असल्यची घोषणा केली. तरीही आक्रमक होत

विरोधकांनी वेलकडे धाव घेतली,

त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: अध्यक्ष या प्रश्नाला न्याय देण्यासाठी बैठक घेणार आहेत

तर त्यांना सहकार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले.  या विषयावर सत्ताधारी पक्षाने गांभिर्याने निर्णय

घ्यायला हवे रोज शेतकरी मरत आहेत असे सांगत विरोधकांनी सकाळी ११ ३२ वाजता सभात्याग केला.

शिक्षण, बँक घोटाळा व विधेयके

राज्यात विद्यार्थी विद्यान वारी आणि मुक्यमंत्री ज्ञानपत्र योजना मंत्रिमंडळासमोर सादर करून लागू करण्यात येत असल्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांनी घोषणा केली.(Vidhansabha-Comentry)

या योजनेची माहिती देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, नासा(NASA) आणि इस्त्रो च्या पातळीवर

नव्या विज्ञानवादी विद्यर्थ्यांचा विकास करण्यासाठी या योजना अपेक्षीत आहेत. या वेळी देवयानी फरांदे यांच्या काही प्रश्नामुळे त्यांच्यात आणि मंत्री भुसे यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्याचा उल्लेख नंतर नाना पटोले(Nana Patole) यांनी केला.

त्यावर मात्र आमच्यातील वादात तुम्हाला न्यायाधिश म्हनून नेमायचे का असा मिश्कील टोला मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला.

यावेळी मंत्री भुसे यांच्या वक्तव्यांचे समर्थन करताना मुख्यमंत्र्यानी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

मंत्री भुसे यांनी देखील नव्या योजनांचे नियोजन करताना त्यात व्यावहारिक काही बाबींचा समावेश करन्यात आल्याचे सांगितले. मात्र वित्त आणि नियोजन विभागाकडून अव्यवहार्य अटी घातल्याने योजनेचा कालावधि लांबत असल्याचे त्यांनी  सांगितले.

याबाबत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत मार्ग काढण्याबाबत त्यांनी आवाहन केले.  वरुण सरदेसाई  योगेश सागर यांनी यावेळी सरकारला या योजना राबविताना काही महत्वाच्या सूचना केल्या. त्यांचा योग्य तो अभ्यास करून त्या लागू करण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.

यवतमाल जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेच्या घोटाळा प्रकरणी विशेष पथक नेमून कारवई करण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. अनिल मांगूळकर यांचा तारांकीत प्रश्न होता.(Vidhansabha-Comentry)

प्रश्नोत्तरा नंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे कामकाज घेण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी लोकायुक्त सुधारणा विधेयक सभागृहात मांडले त्यात करण्यात आलेल्या तरतूदीना राश्ट्रपतीने मान्यता देताना काही बदल

सूचविण्यात आल्याचे सांगत या तांत्रिक बाबीची माहिती त्यांनी दिली त्या नंतर विधेयक मतास टाकण्यात आले,

या विधेयकानंतरऔचित्याचे मुद्दे आणि स्थगन प्रस्तावाच्या सूचनांचे कामकाज घेण्यात आले.

पुरवणी मागण्या व मतदान

महसूल मंत्री चद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या विभागाच्या दोन महत्वाच्या विधेयकांना मंजूरी देण्यासठी ती मांडली त्यात जमिन महसूल संहिता सुधारणा विधेयक आनि हैद्राबाद ईनामे आणि रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा  विधेयकांचा समावेश होता,

महसूलमंत्री धडाकेबाज पणाने काम करत असताना महसूल विभागाला अधिकाधिक लोकोपयोगी

आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे या वेळी जयंत पाटील(Jayant Patil) म्हणाले. तर अश्या प्रकारे लोकप्रियता मिळवणारे महसूल मंत्री धडाकेबाज काम करत असताना त्यात काही संशयाला जागा राहणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले,

त्या नंतर सन २०२५ २६ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा घेण्यातआली,

सायंकाळी ५.३० वाजता चर्चारोध असल्याने या विभागांच्या चर्चा आणि मतदान त्यापूर्वी पूर्ण

करण्याचे बंधन असल्याचे अध्यक्षांनी सूचित केले.

  • निष्कर्षतः एकूणच, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी शेतकरी प्रश्न, शिक्षण धोरण, आर्थिक घोटाळे आणि महत्त्वाच्या विधेयकांवर सखोल चर्चा होऊन राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले.

एकंदरीत हे समालोचन लिहुन पूर्ण होत असताना सभागृहात पुरवणी मागण्यांवरील चर्चा सुरू होती.

 

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक) 

किशोर-आपटे

Social Media