Vidarbha : विदर्भात उष्णतेची लाट तीव्र, तापमान ४७ अंशांच्या उंबरठ्यावर

Vidarbha : विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. विशेषतः नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सियसच्या(Celsius) पुढे गेले आहे. काही ठिकाणी पारा ४६ अंशांवर पोहोचला असून ४७ अंशांच्या दिशेने वाटचाल करत आहे.

हवामान विभागाने पुढील ४८ तास अत्यंत उष्ण राहण्याचा इशारा दिलाय त्यामुळं नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Vidarbha)

अकोला जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असून तापमान सुमारे ४३ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. अमरावती जिल्ह्यात तापमान ४६ अंशांपर्यंत गेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. वर्धा, अमरावती आणि अकोला या भागांमध्ये सातत्याने तापमान ४५ अंशांच्या आसपास राहत आहे.

दरम्यान, राज्यात सध्या कोरडे हवामान असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, संपूर्ण राज्यात सध्या कोरडे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

Social Media