NEET-paper-leak : लातूर कनेक्शन उघड? पोलिसांकडून चौकशी, चौघांचे जबाब नोंद.

NEET UG-paper-leak : लातूर कनेक्शन उघड? पोलिसांकडून चौकशी, चौघांचे जबाब नोंद.
NEET UG-paper-leak : NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन अधिक गडद होण्याची शक्यता आहे. एका विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी तपास गतिमान करत संशयास्पद खासगी क्लासेसची कसून चौकशी सुरू केली आहे.

अत्यंत गुप्तपणे तपास सुरू असून क्लास चालकाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. बुधवारी पहाटे दोन आणि त्यानंतर आणखी दोन अशा एकूण चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून पोलीस चौकशीतून मिळालेल्या माहितीची बारकाईने पडताळणी करत आहेत.

NEET Complaint Filed : विद्यार्थिनीच्या पालकांची गंभीर तक्रार (NEET UG-paper-leak)

12 मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली. लातूरमधील एका खासगी क्लासेसने NEET(UG)-2026 पूर्वी घेतलेल्या मॉक टेस्टमधील 42 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चौकशीचे आदेश

NEET पेपरफुटी प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अमोल तांबे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी समरजीत साळवे यांच्याकडे चौकशी सोपवली आहे.

या प्रकरणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. नाशिकमधून पेपर फुटल्याचा दावा असून शुभम खैरनार नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने 15 लाखांना पेपर विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून त्याला पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेले जाणार आहे.

NEET UG 2026 रद्द:

22 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान 3 मे रोजी आयोजित NEET UG 2026 परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली आहे. देशभरातील 22 लाख, तर महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पेपर 42 तास आधी लीक झाल्याच्या कारणावरून हा निर्णय घेतला.

पुनर्परीक्षेसाठी नोंदणी किंवा शुल्क नाही: NTA नुसार, विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. पूर्वी भरलेली परीक्षा फी ग्राह्य धरली जाईल. बहुतेक विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा त्याच केंद्रांवर होण्याची शक्यता आहे आणि नवीन वेळापत्रक व प्रवेशपत्रे अधिकृत वेबसाइटवर लवकरच जाहीर केली जातील.

Social Media