Narahari Ziraval : राज्याचे अन्न व औषध (Food-and-medicine)प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ (Narahari-Ziraval)यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालय सिल केले आहे. या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे या कर्मचा-याने सांगितल्याची माहिती समोर येतेय. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांनी “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मांडली आहे. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे.