मनोज जरांगे : कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi)सरकारचा जावई लागतो काय? साबरमतीच्या जेलमधून ऑर्थररोड जेलच्या अंडासेल मध्ये बसवा: हर्षवर्धन सपकाळ
दुष्काळाने शेतकरी हवालदिल असताना पंचनामे, अभ्यास, सर्वेचे नाटक कशाला? दिवाळीच्या आधी हेक्टरी १ लाख रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करा.
मुंबई : कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बसून मुंबईत धुडगूस घालतो. लोकप्रतिनिधी, बॉलिवूडमधील कलाकारांना
धमक्या देतो, गोळीबार करतो, हत्या करतो. भाजपा महायुती सरकारने बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली परवानगी दिली आहे का? लॉरेन्स बिन्शोई
सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर साबरमतीच्या जेलमधून बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईच्या
ऑर्थर रोड जेलच्या अंडासेलमध्ये बसवून चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला
आहे. फक्त बॉलिवूडच भितीच्या सावटाखाली जगत नसून संपूर्ण महाराष्ट्र भितीच्या सावटाखाली आहे. सरकारच्या नाकाखाली टिच्चून मुंबईत
अभिनेता टायगर श्रॉफवर जिवघेणा हल्ला करण्यात आला. याआधी एका माजी मंत्र्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
राज्यात वाढलेली गुन्हेगारी, माफियागिरी, गँगचा सुळसुळाट हे गृहविभागाचे अपयश असून राज्याला देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय गृहमंत्री
लाभलेले आहेत, त्याचा हा परिणाम आहे. राज्याला आतातरी पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मनोज जरांगे : ५०० कोटींच्या आरोपाची ED चौकशी करा..
मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या देवाण घेवाणीची ऑडीओ क्लिप जाहीर केली आहे. या ऑडिओमध्ये ज्यांची ज्यांची नावे आहेत
त्यांची चौकशी झाली पाहिजे, संपूर्ण प्रकरणाची ED चौकशी करून ५०० कोटी रुपये कुठून आले? कोणी आणले? कोणाला दिले? याची चौकशी करा.
यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतलेले आहे, त्यांना अटक करा, अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ
यांनी केली आहे.
मोदींच्या मंत्र्याचे एपस्टिन कनेक्शन…
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो(Marco Rubio) हे जामनगरमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेत असतानाच मोदी सरकारमधील मंत्री
हरदिप पुरी यांचा एपस्टिनबरोबरचा फोटो समोर येणे हा काही योगायोग नाही. आपण एपस्टिनला एका शिष्टमंडळासोबत भेटलो होतो,
असा दावा हरदीप पुरी यांनी केला होता पण फोटोत तर ती खाजगी भेट दिसत आहे. जगभरातील ज्या देशातील व्यक्तीचे नाव एपस्टिनबरोबर आले
त्यांच्या चौकशा सुरु आहेत, राजीनामे घेतले आहेत पण मोदी सरकारमधील मंत्री हरदीप पुरी यांना मात्र वाचवले जात आहे. संसदेत एपस्टिन शब्द
उच्चारला तरी माईक बंद केला जातो, बोलू दिले जात नाही. एवढया घाणेरड्या प्रकरणात मोदी सरकारमधील मंत्र्याचे नाव आले असतानाही त्यांच्यावर
कारवाई का होत नाही, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे : मंत्री परिणय फुकेंचे आरोप बिनबुडाचे..
भाजपाचे मंत्री परिणय फुके(Parinay Fuke) यांनी राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यावर केलेला आरोप हा बदनामी करण्याचा प्रकार आहे.
भाजपा आरएसएसने महात्मा गांधी, पंडित नेहरु यांनाही सोडले नाही, त्यांचीही अशीच बदनामी केली. चारित्र्यहनन करणे ही त्यांची विकृती आहे.
याच परिणय फुके यांच्या कुटुंबातील एक गंभीर प्रकरण आमच्याकडे आले होते पण तो कौटुंबिक वाद आहे, असे सांगून आम्ही त्याची वाच्यता केली नाही,
हा सामंज्यसपणा आम्ही दाखवला. फुकेंनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्याची गरज वाटत नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..
राजा उदार झाला, हाती भोपळा दिला.
राज्यात भिषण दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी हवालदिल आहे पण भाजपा महायुती सरकारची मदत म्हणजे ‘राजा उदार झाला आणि हाती
भोपळा दिला’ असा प्रकार आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश पडेल का, हा यक्षप्रश्न उभा ठाकला
आहे. सरकार फक्त पोकळ घोषणा करत आहे. तातडीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी १ लाख रुपये जमा करा, सरसकट कर्जमाफी करा,
जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा, पिण्याच्या पाण्याची सोय करा, शेतमजुरांना अनुदान व मोफत १२ गॅस सिलेंडर द्या, जुनी रोजगार हमी योजना
लागू करा, मुलांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करा, विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसचा पास द्या, अशा मागण्या हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्या आहेत.
Published by -SanvadMedia