दुष्काळाने शेतकरी हवालदिल असताना सत्ताधारी भाजपा नेत्यांची भपकेबाज इव्हेंटबाजी, गरबा इव्हेंटवर १०० कोटींची उधळपट्टी

गरबा इव्हेंटवर कोटींची उधळपट्टी  : दुष्काळाने शेतकरी हवालदिल असताना सत्ताधारी भाजपा नेत्यांची भपकेबाज इव्हेंटबाजी, गरबा इव्हेंटवर १०० कोटींची उधळपट्टी : अतुल लोंढे.

मुंबई/नागपूर : राज्यात १९७२ पेक्षा भिषण दुष्काळ पडलेला आहे, ३०५ तालुक्याला या दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य

जनतेचे प्रचंड हाल होत आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यास पैसे

नाहीत. दसरा-दिवाळी तोंडावर आली तरी सणासाठी हातात पैसा नाही अशी अत्यंत वाईट परिस्थिती असताना सत्ताधारी भाजपा नेते मात्र

भपकेबाज इव्हेंटबाजीवर जवळपास १०० कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहेत, असा गंभीर आरोप करत अशा असंवेदनशील नेत्यांचे

राजीनामे घेण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील काय, असा प्रश्न काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

गरबा इव्हेंटवर कोटींची उधळपट्टी  : नवरात्रोत्सवावर कोट्यवधींचा खर्च, दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.

नागपूर मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, सध्या नवरात्र उत्सव सुरु असून देवीची आराधना केली जात आहे पण

सध्याची परिस्थिती पाहता उत्सव साधेपणाने साजरा करता येऊ शकतो. जनतेला काटकसर करण्याचे आवाहन करता आणि भाजपा नेतेच

उत्सवाच्या नावाखाली गरब्याचे आयोजन करून करोडो रुपयांची उधळण करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार,

आमदार अतुल भातखळकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आ. संजय उपाध्याय, आ. विनोद शेलार यांनी गरब्यावर भरमसाठ खर्च केला आहे,

हा प्रकार दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारा व जखमेवर मीठ चोळणारा विकृत प्रकार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथे नमो नमो नवरात्री उत्सव आयोजित केला असून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलनात

गरब्यासाठी मोठा एअर कंडिशन मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात मोठमोठे झुंबर आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

मोठ्या स्वागत कमानी आणि एलईडी स्क्रीन्स, एलईडी लाईट्सचा झगमगाट करण्यात आला

आहे. दररोज १० ते १५ हजार लोक या सहभागी होतात. यासाठी ७००० चौरस फूटांचा इनडोअर प्लॅटफॉर्म, २०००० फुटांचा आउटडोअर प्लॅटफॉर्म

केला असून त्यासाठी ६० लाख रुपयांचा खर्च केला आहे. मंडपात २००० टनचा एसी, ज्याचे भाडे दररोज ६० लाख रुपये आहे. साउंड आणि

लाईट्सवर दररोज २५ लाखांचा खर्च, मंडपासाठी २५ जनरेटर सेट्स, दररोजचे ६.५ लाख रुपयांचे भाडे. गुजराती लोकसंगीतातले सुप्रसिद्ध

गायक आणि नृत्य कलाकारांना करोडो रुपये मोजून बोलावण्यात आले आहे. निलेश गढवी हा नावाजलेला गायक नवरात्रीमध्ये १ ते २ कोटी रुपये

शुल्क आकारतो. कविता राम, सागर केंडूरकर, माधवी श्रीवास्तव, अंशिका चोणकर हे प्रसिद्ध गायक कला सादर करत आहेत. या कलाकारांची

एका दिवसाची फी २ ते ५ लाख रुपये आहे. सिम्फनी बँड हा प्रसिद्ध बँड गायकांच्या दिमतीला आहे. संगीत आणि गायक कलाकारांसाठी एकूण

चार ते पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंडपात विविध फुलांच्या आरासीवर आयोजकांकडून दररोज ३ ते ५ लाख रुपये खर्च केले

जात आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडून दररोज १ ते १.५ कोटींचा खर्च केला जात असून एकूण बजेट १८ ते २० कोटींच्या घरात आहे.

जनतेला काटकसर करण्याचा संदेश देता मग असंवेदनशील भाजपा नेत्यांचे काय, आशिष शेलार, रविंद्र चव्हाण यांचे राजीनामे देवेंद्र फडणवीस घेणार का?

रवींद्र चव्हाणच नाही तर भाजपचे मंत्री आशिष शेलार भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही गरब्याचे आयोजन केले असून यावर दररोज

कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. दुष्काळाचे भान राखून सण उत्सव साधेपणात साजरे करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केले होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्याच आवाहनाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan)

आणि मंत्री, आमदारांनीच हरताळ फासला आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ५००० रुपयांची मदत जाहीर करणाऱ्या सरकारमधील भाजपचे मंत्री आणि आमदारांकडून नवरात्री आणि गरबा

आयोजनावर दररोज १० ते १५ कोटींची उधळपट्टी केली जात आहे असेही अतुल लोंढे(Atul Londhe) म्हणाले..

छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासवर प्रौढ प्रताप पुरंदर या भव्य महानाट्याचा स्तंभपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. पालकमंत्री

संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला

समजला पाहिजे पण त्यासाठी दुष्काळात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून भव्य कार्यक्रम करण्याची गरज काय? मराठवाड्यात दुष्काळाची

दाहकता प्रचंड असताना नेत्यांना सामाजिक भानही असू नये का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Published by – SanvadMedia

Social Media