विधानपरिषद निवडणूक बिनविरोध : भाजप उमेदवारांनी सातव यांच्यासाठी उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या निवडणूक बिनविरोध होऊ शकतात असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं
कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सहा पैकी पाच जागा निश्चितपणे मिळतील. तरीही विरोधकांकडून चांगला प्रस्ताव आल्यास विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपा विचार करेल असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
भाजप उमेदवारांनी सातव यांच्यासाठी उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या निवडणूक बिनविरोध होऊ शकतात असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं
येत्या 26 नोव्हेंबर पर्यंत तसा काही प्रस्ताव आल्यास विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यात अडचण असणार नाही असही त्यांनी सांगितलं .