Jal-Jeevan-Mission : “महाराष्ट्र दुष्काळमुक्तीसाठी केंद्र-राज्य एकत्र; जलजीवन मिशन आणि सिंचन योजनांना गती”
Jal-Jeevan-Mission : केंद्र सरकारच्या जलसंपदा आणि सिंचन योजनांना गती देत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra-Fadnavis) यांनी दिली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील (C. R.-Patil) यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्रातील विविध जलसंधारण, सिंचन आणि पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. (Jal-Jeevan-Mission)
या बैठकीत केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच राज्यातील विविध जलसंधारण प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीवर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra-Modi) यांचे महत्त्वाकांक्षी स्वप्न असलेल्या ‘जल जीवन मिशन’ची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असून केंद्र सरकारकडून अधिक सहकार्य अपेक्षित आहे. प्रलंबित प्रकल्प पूर्ण करून ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यावर राज्य सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सुरू असलेल्या अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधीची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. या मागण्यांना केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील (C. R.-Patil) यांनी जलसंधारणात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत ‘जलसंचय आणि जनभागीदारी’ या संकल्पनेवर आधारित व्यापक लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन केले. विदर्भ आणि नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पारंपरिक धरणांसोबत जलसंधारणाच्या नव्या मॉडेल्सची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘जलतारा’ योजनेचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
सीजीओ कॉम्प्लेक्स येथील पंडित दीनदयाळ अंत्योदय भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath-Shinde) उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,(Sunetra-Ajit-Pawar) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, (Radhakrishna-Vikhe-Patil,) मंत्री गिरीश महाजन,(Girish Mahajan,) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील तसेच केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.