मंकी बात…

बेरोजगारी महागाईच्या विळख्यात दुष्काळाची भर! सरकार राजकीय खेळात, राज्य ‘राम भरोसे’!?

बेरोजगारी महागाईच्या विळख्यात दुष्काळाची भर! सरकार राजकीय खेळात, राज्य ‘राम भरोसे’!?

जखम मांडीला मलम शेंडीला :  दसरा संपला आणि महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीच्या विरोधात वारे फिरल्याचे संकेत देणाऱ्या घडामोडींची

मालिकाच समोर आली आहे. आधी मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्ब ने धुमाकूळ घातला होता. त्यात सत्ताधारी सेना भाजप नेत्याकडून राजकीय

तलवारी उपसण्यात आल्या, पण नंतर सारवासारव आणि केंद्रीय नेत्यांकडून दरडावणी झाल्याने चौकशी समिती घोषित करत वादावर पडदा टाकण्यात

आल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत पाच पैकी तीन जागा महाआघाडीने आणि त्यातही दोन जागा शरद पवारांच्या

राष्ट्रवादीने जिंकल्या नंतर पुन्हा सत्ताधारी भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांनी युतीधर्म तोडल्याची ओरड करण्यात आली.

या निवडणुकीत नागपूरात भाजपच्या बालेकिल्यात मुख्यमंत्री आणि संघाच्या होमपिचवर देशातील पहिला आणि एकमेव विजय मिळवत

कॉंग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली! तर गोकूळ दूध महासंघानंतर पुण्यात पदवीधर निवडणूकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने

एकजुटीने महायुतीचा पराभव केला. त्यामुळे राज्यात सत्ताधा-यांच्या आपसातील कलगीतु-याच्या बातम्यांना बहर आला होता.

जखम मांडीला मलम शेंडीला
गुजरातच्या टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी सह्याद्रीच्या कुशीवर घाव घालत जंगलतोड सुरू झाल्याच्या बातम्यांचे रान पेटले!

सह्याद्रीच्या कुशीवर घाव – जखम मांडीला मलम शेंडीला :

मात्र त्यानंतर गुजरातच्या टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी सह्याद्रीच्या कुशीवर घाव घालत जंगलतोड सुरू झाल्याच्या बातम्यांचे रान पेटले!

या प्रकल्पामुळे माधव गाडगीळ समिती आणि कस्तुरीरंगन आयोगाच्या ‘इको सेन्सिटीव झोन’ मधील शिफारषीना मुठमाती देत घनदाट

जंगलातील हजारो झाडे सत्ताधा-यांच्या दोस्तीसाठी ‘जमिनदोस्त’ केली जात असल्याचे स्पष्ट झाले. आता या प्रकल्पाचा मालक पंतप्रधानांच्या

खास जवळचा मित्र आणि सत्ताधारी भाजपला कोट्यावधीचा ‘इल्केशन बॉण्ड’ देणारा बडा उद्योगपती असल्याने राज्यातील सत्ताधारी नेत्यांना

यात काहीही करता येत नसल्याचे वास्तव समोर आले. मात्र सह्याद्री प्रेमी मराठी तरुणांनी पुढाकार घेत ही तोड थांबवण्यासाठी लढा सुरू केला

आणि राज्यात विकासाच्या प्रकल्पासाठी पर्यावरणाचा बळी नको असा मतप्रवाह सुरू झाला.

जखम मांडीला मलम शेंडीला : एकत्र येतील की दोनाचे तीन होतील?

त्यातच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ऐन दिवाळीच्या सणात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या दोन शकलाचे विलीनीकरण करण्याच्या चर्चांना वेग आला

आहे. हे दोन गट आता एकत्र येतील की दोनाचे तीन होतील? याबाबतही राजकीय चर्चा आणि आडाखे बांधले जावू लागले आहेत.

२८ जानेवारी २०२६ रोजी दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवस दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची चर्चा शरद पवार यांच्या गटाकडून

सुरू करण्यात आली होती. मात्र ‘महासक्ती;च्या नेत्यांकडून त्याला विरोधाची निती वापरण्यात आली आणि दादांच्या चितेची राखही निवली नाही

त्या आधीच त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ देण्यात आली. त्यानंतर आता आठ महिन्यांचा काळ उलटून

गेला आहे.

जखम मांडीला मलम शेंडीला
एकत्र येतील की दोनाचे तीन होतील?

सुनेत्रा वहिनी त्यांच्या गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि दादांच्या रिक्त जागेवर आमदारही झाल्या, मात्र सुनेत्रा पवार यांच्या ऐवजी पक्षाचे अध्यक्षपद

प्रफुल्ल पटेल यांना मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न झाल्याने तसेच दादांच्या अपघाती मृत्यूबाबत गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याबाबतही

जोरदार वादंग झाले. त्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दलही उलटसुलट चर्चा झाल्या. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून

आधी विलीनीकरणाबाबत आणि नंतर दादांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत जोरदार वक्तव्ये करण्यात आली मात्र या सा-या घडामोडीनंतर

विलीनीकरणाच्या चर्चा थंडावल्या. दादांच्या अपघाता प्रकरणी डिजीसिएच्या अहवालापासून विशेष तपास पथकापर्यत आणि सीआयडी पासून

सिबिआय पर्यत चौकशीच्या घोषणा झाल्या मात्र साधा एफआयआर देखील दाखल करुन घेण्यात आला नाही. दरम्यान त्यांचा सुपूत्र पार्थ राज्यसभेत

खासदार झाला शिवाय त्यांचा विवाह देखील झाला. त्याच वेळी दादांच्या हयातीतच ठरल्यानुसार त्यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या

कन्येचा देखील विवाह रास्व संघाशी संबंधित लाखानी या नागपूरच्या उद्योजक घराण्यात झाला आहे. दादांच्या अपघाती निधनानंतर पक्षाच्या

नेत्या रूपाली चाकणकर यांच्या कॅप्टन खरात प्रकरणावरूनही मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते, त्यात अखेर सुनेत्रा पवार यांनी चाकणकर

यांना महिला प्रदेश अध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यातही पक्षात मोठ्या प्रमाणात असंतोष

असल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी पक्षाला आता दादांच्या रिक्त वित्तमंत्रीपदी कुणाची वर्णी लावायची आहे, त्याशिवाय धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे रिक्त मंत्रीपद

देखील भरायचे आहे. त्याकरिता पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई यांच्या पेक्षा त्यांचे पूत्र पार्थ यांचा शब्द अंतिम असल्याचे सांगण्यात येवू लागले.

यावरून पार्थ पवार आणि ज्येष्ठ नेते तसेच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात मतभेद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पक्षातील वाद आपसात मिटवता येत नसल्याने ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.

जखम मांडीला मलम शेंडीला

पक्षात तिसऱ्या फुटीचे संकेत?

दरम्यान अमित शहा(Amit Shah) यांनी आपसात बसून वाद मिटविण्याचा सल्ला दिला शिवाय दोन्ही गट एकत्र करण्याबाबत याच सुमारास

शरद पवार यांच्याकडून भाजपला लोकसभेत डिलीमिटेशन विधेयक मंजूरीसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात आपला तोडलेला पक्ष पुन्हा परत

देण्याबाबत गळ घालण्यात आली असून केंद्रातील नेत्यांकडून ही अट मान्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच अमित शहा यांनी

अजित गटाच्या नेत्यांना जुळवून घेण्याचे संकेत दिले असावेत असे जाणकार मानतात. याला पुश्टी मिळाली ती सुनील तटकरे यांच्याकडून आलेल्या वक्तव्याची!

‘१२ फेब्रुवारीला विलीनीकरण करण्याचे ठरल्याचे समजले होते’ असे वक्तव्य करत तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात  पक्षात तिस-या

फुटीचे संकेत तर दिले नाहीत ना? असे सांगण्यात येत आहे. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांच्यावर राजकीय दबाव टाकून

आपले आस्तित्व दाखवून देण्याची प्रदेशाध्यक्ष यांची ही राजकीय खेळी आहे, की महाशक्तीच्या इशाऱ्यानुसार केलेल भाष्य आहे यावरही चर्वित

चर्वण सुरू आहे.

काही राजकीय सूत्रांनी मात्र रायगड जिह्यात सुरू असलेल्या कर्जतच्या जंगलतोडीच्या मुद्यावरुन माध्यम आणि जनतेचे लक्ष वळविण्यासाठी

‘आले देवाजीच्या मनी’ म्हणून रणनितीनुसार तटकरे यांनी हे वक्तव्य केल्याचे देखील मत व्यक्त केले आहे.

जखम मांडीला मलम शेंडीला
पवारांचा दिवाळसण दु:खाच्या सावटात

पवारांचा दिवाळसण दु:खाच्या सावटात

ऐन दिवाळीत यंदा पवारांच्या घरचा दिवाळसण दु:खाच्या सावटात असल्याने होवू शकला नाही, मात्र वादंगाच्या फटाक्यांच्या आवाजामुळे ऐन

दिवाळीत शरद पवार(Sharad Pawar) यांच्या पक्षाच्या बातम्याकडे माध्यमाचे लक्ष लागले आहे. त्यातच शरद पवार आधी पुण्यात आणि नंतर

मुंबईत रूग्णालयात दाखल झाले आणि तेथे त्यांना राजकीय नेत्यांची भेटीगाठीसाठी रांग लागल्यानेही उत्सुकता वाढली. मात्र आता ‘दहा तारखेला

भेटू’ असे सांगत स्वत: मोठ्या साहेबांनी संकेत दिले आहेत. तर ‘रुग्णालयात राजकीय काही बोलण झाले नाही’ असे पटेल यानी म्हटले आहे.

याच दरम्यान पार्थ पवार यांच्या सिल्व्हर ओक येथे चकरा सुरू झाल्याने राष्ट्रवादीत विलीनीकरणाच्या या चर्चा आता भाजपला हव्या असल्या तरी

त्या पवारांच्या नेत्यांना पचनी पडायची शक्यता कमी आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच अजित गटाच्याही अनेकांना यासाठी अजून तयारी नसल्याचे

सांगण्यात येत आहे. मात्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी याबाबत महाशक्तीने ‘सक्ती’ केली तर काहीही घडू शकेल! असे राजकीय जाणकार

सांगत आहेत.

गोकूळ निवडणूकीच्या राजकारणाचा ‘दहिकाला’!

गोकूळ निवडणूकीच्या राजकारणाचा ‘दहिकाला’!

राष्ट्रवादीच्या वादावादीशिवाय राज्यात सध्या गाजतोय तो गोकूळ दूध महासंघाच्या निवडणूकीच्या राजकारणाचा दहिकाला झाल्याचा विषय!

कॉंग्रेस नेते आमदार बंटी (सतेज) पाटील यांनी गोकूळच्या २५ पैकी १३ संचालकाच्या जागा आपल्या गटाकडे एकहाती निवडून आणत जवळपास

बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून ‘रडीचा डाव’ खेळण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या

चुकीच्या पायंड्याला मुख्यमंत्री फडणवीस बळी पडले आहेत. गोकूळच्या महासंघात सरकारने निवडणूक होवून निकाल जाहीर झाल्यानंतर

चार तज्ज्ञ संचालक नेमत त्यांना राज्यात पहिल्यादाच मतदानाचा अधिकार देण्यात येत असल्याचा अध्यादेश काढला आहे.

(हीच गोष्ट यापूर्वी अमूल या गुजरातच्या दुध महासंघात घडली होती मात्र न्यायालयात सरकारच्या हडेलहप्पीचे वागणे टिकले नाही.) त्यामुळे

कोल्हापूरात दहा तारखेला ऐन दिवाळीत महामोर्चाची हाक देण्यात आली आहे. त्यानंतर सरकारकडून बंटी पाटलांशी समेटाची भाषा करण्यात

येत आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या राज्यात मनमानी कारभार कसा सुरू आहे याचे हे उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल. कोल्हापूरात राज्याचे

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शब्द चालतो आणि ते कोल्हापूरचे जावई असलेल्या केंद्रीय नेत्यांच्या मताने निर्णय घेत असल्याने यामध्ये

मुख्यमंत्र्याचा नाईलाज असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणात भाजप सरकारची अवस्था ‘गाढव गेले अन ब्रम्हचर्यही गेले’

अशी झाल्याचे सांगण्यात येत आहे!

जखम मांडीला मलम शेंडीला

‘जखम मांडीला मलम शेंडीला’

महाराष्ट्राचे राजकारण सध्या असे रसातळाशी स्पर्धा करताना दिसत आहे, त्यातच सुमारे सव्वातिनशे तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला

आहे. पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न येत्या काळात भेडसावणार आहे. त्याशिवाय जनावरांचा चारा आणि शेतक-याना मदत करण्याचा मोठा प्रश्न

राज्यकर्त्यासमोर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यासह सगळ्या मंत्र्यानी दिवाळी पहाट शेतक-यांच्या बांधावर जात साजरी केली आहे.

त्याला ‘जखम मांडीला मलम शेंडीला’ असेच म्हणावे लागणार आहे. मात्र केंद्रातून फार मोठ्या मदतीची गरज आहे पण अपेक्षा करण्यात

पूर्वानुभवानुसार फारसे स्वारस्य नाही. सामान्य जनतेच्या जगण्याचे प्रश्न तिव्र होताना दिसत आहेत. शिक्षणासह अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार,

बेरोजगारी महागाईच्या विळख्यात दुष्काळाची भर पडल्याने राज्य राम भरोसे चालले आहे!

 

लेखक व राजकीय विश्लेषक
 
किशोर आपटे ९८६९३९७२५५

किशोर-आपटे

Published by – SanvadMedia

 

हेही वाचा – दिवाळी २०२६ ते २०२९ : राज्याच्या राजकारणात सावध ऐका पुढल्या हाका!

Social Media