केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

India-closed : केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई :केंद्रातील भाजपा (BJP)सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून तीव्र विरोध केला जात आहे. या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी उद्या गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत बंदची हाक दिली आहे. (India-closed)

India closed

शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या भारत बंदला पाठिंबा दिला असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे.

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामगारांच्या समोर विविध प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहचलेली आहे, या नव्या बदलामुळे कामगारांच्या हाताला कमी संधी मिळणार आहे.

India closed

केंद्रातील भाजपा सरकारचे धोरण हे शेतकरी व कामगार विरोधी असल्याने या बंदमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, अशा सुचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harsh-vardhan-sapakal) यांच्या आदेशावरून देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील (Ad-Ganesh-Patil) यांनी दिली आहे.

Social Media