हाडपक गणपती उत्सव : विदर्भातील एक आगळा-वेगळा सांस्कृतिक वारसा

Hadpakya-Ganpati : अनंत चतुर्दशीला पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन करण्यात येते… दहा दिवस गणेशभक्तांनी मनोभावे सेवा करून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो… गणेशोत्सव संपला की नागपुरात आणि विदर्भात गणेश विसर्जनानंतर पितृपक्षामध्ये हडपक्या गणपती किंवा मस्कऱ्या गणपती म्हणून ओळख असलेल्या बाप्पाची स्थापना केली जाते. नागपूरचे राजे भोसले यांच्या वाड्यात गणपती बाप्पाची विशेष स्थापना होत असते. या उत्सवात लावण्या, पोवाडे, नकला, खडी गंमत यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे गणपतीला मस्कऱ्या गणपती असे नाव मिळाले, आणि विदर्भात पितृपक्षाला हाडपक असे म्हणतात त्यामुळे हाडपक्या गणपती म्हणूनही हा उत्सव प्रचलित आहे…

हडपक्या गणपती स्थापनेची सुरुवात(Hadpakya-Ganpati)

इ.स. १७८७ मध्ये समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमणाबापू यांनी नागपूरच्या भोसले वाड्यात हाडपक गणपतीची स्थापना केली. त्या काळात गणपतीची मूर्ती १२ हातांची आणि २१ फूट उंच होती. ही मूर्ती अत्यंत भव्य आणि प्रभावी स्वरूपाची होती, जी बंगाल विजयाच्या आनंदोत्सवाचे प्रतीक मानली गेली.

२००५ पासून, मूर्तीची उंची कमी करण्यात आली. सध्याची मूर्ती ७ फूट इतकी उंच होती तर आता म्हणजेच 2025 मध्ये या मूर्तीची उंची ही तीन ते साडेतीन फूटापर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे..काळानुरुप या गणपतीची उंची कमी होण्यामागचे कारण म्हणजे मोठ्या मूर्तींचे विसर्जन आणि स्थापनेत निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच सुरक्षा आणि वाहतूकीचा प्रश्न देखील आहेच..त्यामुळे नव्या पिढीच्या गरजांनुसार उत्सवाचे स्वरूप अधिक सुलभ आणि व्यवस्थापनीय करण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात आला आहे..

1887 साली गणपती बाप्पाची स्थापना झाली आणि तेव्हापासून ही अखंडित सुरू आहे. 1887 मध्ये पश्चिम बंगालमध्ये मराठा साम्राज्याचे सरदार चिमणाजी भोसले बंगालवर स्वारी करण्यासाठी गेले. त्या ठिकाणाहून विजय मिळवल्यानंतर, त्यांनी गणपती उत्सवाची सुरुवात केली. गणपती बाप्पाला विजयाचा नवस बोलला जातो आणि तो फेडण्यासाठी पितृपक्षामध्ये गणपतीची स्थापना केली जाते. दुसरीकडे, 237 वर्षांची ही परंपरा आजतागायत सुरू आहे.. पितृपक्षामध्ये चालणारा हा गणपती उत्सव असून यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

नागपूरमध्ये ही अखंड परंपरा तत्कालीन राजा मुधोजी राजे भोसले यांचे वंशज चालवतात. चिमाजी भोसले यांनी 12 हात असलेली 21 फूट उंच गणपतीची मूर्ती स्थापित केली होती. बरीच वर्षे ही परंपरा तशीच पाळली जात आहे. त्यानंतर 2005 पासून मूर्ती मोठ्या प्रमाणात आकर्षक बनवण्यात आली. अनंत चतुर्दशीला या गणपतीची स्थापना केली जाते. हा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्यामागे लोककलेला प्राधान्य देण्याचा उद्देश्य होता. यामध्ये लावणी, पोवाडा, भजन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Social Media