Gadchiroli-Chandrapur : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांतील धान खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणावर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी
मुंबई : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पणन महासंघाच्या माध्यमातून होणाऱ्या धान खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा मुद्दा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay-Vadettiwar)यांनी विधानसभेत उपस्थित केला. विशेषतः अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांच्या विरोधात अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रधान सचिवांना पत्र लिहून सविस्तर माहिती दिली आहे,अस वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले. (Gadchiroli-Chandrapur)
या प्रकरणी चौकशी दरम्यान आणि प्रत्यक्ष भेटींनंतर धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.प्रत्येक शेतकऱ्याकडून अडीच किलो अतिरिक्त धान नियमबाह्यपणे घेतले जात आहे. तसेच, रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली १०० रुपये आणि हमालीचे पैसे बेकायदेशीरपणे वसूल केले जात आहेत.
जे लोक प्रत्यक्षात शेतकरी नाहीत, त्यांची नावे नोंदवून त्यांच्या नावे शासनाचा बोनस लाटला जात आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केला.
चांगल्या दर्जाचे धान बाहेर विकून, त्याऐवजी रेशन मधील धान गोदामात आणून ठेवले जात आहे. या अधिकाऱ्याने दोन दिवसापूर्वीच २ लाख क्विंटल धान बाहेर विकल्याचा संशय वडेट्टीवार(Sansha-Vadettivar) यांनी व्यक्त केला.
चामोर्शी येथील राईस मिल मध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित अधिकाऱ्याने पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.चौकशीमध्ये निष्पक्षता राखण्यासाठी
संबंधित दोषी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे.अधिकाऱ्याने जमवलेल्या बेहिशोबी मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक (Anti-bribery) विभागामार्फत सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
यावर मंत्र्यांनी उत्तर देताना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले.