मुंबई : राज्याच्या नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात दुचाकीपासून चारचाकी हलक्या व जड इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीवर 10 ते 15 टक्के सवलत मिळणार असून पर्यावरणाचे जतन आणि पेट्रोल, डिझेलच्या वाहनांची संख्या कमी करण्यासाठी विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नव्या विद्युत वाहन ( EV ) धोरणाला मंजूरी दिली.
तसेच मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सर्व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना आणि बसेससाठी टोलफ्री करण्यात आला आहे. वाहनांतून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात नव्याने नोंदणी होणार्या वाहनांपैकी जास्तीत जास्त वाहने इलेक्ट्रिक असावीत यासाठी ‘इव्ही’ धोरण आणले आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी, चारचाकी (परिवहनेत्तर), राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेस तसेच खासगी, राज्य व शहरी परिवहन उपक्रमांतील बसेस यांना मूळ किंमतीच्या 10 टक्के तर इलेक्ट्रिक तीनचाकी मालवाहू वाहने, चारचाकी (परिवहन), चारचाकी हलके मालवाहू वाहन, चारचाकी मालवाहू वाहने तसेच शेतीसाठीचे इलेट्रिक ट्रॅक्टर व एकत्रित कापणी यंत्र वाहनांसाठी मूळ किमतीच्या 15 टक्के सवलत या धोरणाने दिली आहे.
हे धोरण 2030 पर्यंत लागू राहणार असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येत्या पाच वर्षांसाठी 1 हजार 993 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 25 किमी अंतरावर चार्जिंगची सुविधा. त्यानुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 25 किमी अंतरावर चार्जिंग सुविधा उभारली जाणार आहे. यामुळे राज्यात विद्युत वाहनांचा वापर आणि विक्रीमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.
The new Electric Vehicle (EV) policy of Maharashtra aims to promote the adoption of electric vehicles by offering 10 to 15% subsidies on the purchase of two-wheelers, four-wheelers, and both light and heavy EVs.
The state cabinet has approved this policy to encourage the use of electric vehicles, reduce dependence on petrol and diesel vehicles, and contribute to environmental conservation.
This initiative is expected to help curb pollution and create a sustainable transport system.
Would you like more details on how this policy impacts Maharashtra’s EV industry?