Devkhel-series : झी 5 (Zee 5) वर प्रदर्शित झालेल्या ‘देवखेळ’ या वेब सिरीजविरोधात कोकणातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Devkhel-series : सिरीजमध्ये कोकणची संस्कृती, धार्मिक (Culture, religious)परंपरा व स्थानिक देवदेवतांचे चुकीचे व अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप कोकणवासीयांकडून केला जात आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सांगत विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी सिरीजवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
‘देवखेळ’ (Devkhel) या नव्या वेब सिरीजवर कोकणवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta-Mali) आणि अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिरीजचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात शंकासुर या पात्राला नकारात्मक रूपात दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Devkhel-series)
कोकणातील काही समाजबांधवांनी म्हटले आहे की, “शंकासुर आमच्यासाठी देव आहे. आम्ही त्याची पूजा करतो. देव शिक्षा देत नाही, आशीर्वाद देतो. त्यामुळे आमच्या श्रद्धेचा अपमान करू नका.” त्यांनी सिरीजच्या कथानकावर आक्षेप घेत, आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे स्पष्ट केले आहे.
काही संघटनांनी झी 5 (Zee 5) प्रशासनाला निवेदन देत आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. संतप्त नागरिकांकडून झी 5 च्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा किंवा कार्यालय फोडण्याचा इशारा दिल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून येत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर झी 5 (Zee 5) कडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
या वादामुळे झी 5 च्या कार्यालयावर हल्ला करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. “जर प्रोमो हटवला नाही, तर कार्यालय फोडू,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे सिरीजच्या निर्मात्यांवर दबाव वाढला असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.