Dedication is the Lions Club : लॉयन्स क्लब ऑफ नागपूरला प्रांतपालांची भेट
नागपूर : समाजासाठी समर्पित भावनेने केलेले काम हीच लॉयन्स क्लब (Lions-Club)ची ओळख आहे. समाजाकडून काही घेण्यापेक्षाही समाजाला अधिकाधिक देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी क्लब सदस्यांनी यापुढेही अधिक धडपड करावी, आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही भारतासाठी विविध प्रकल्पांकरिता मदत खेचून आणावी असे आवाहन लॉयन्स क्लबचे प्रांतपाल भरत बलघट यांनी येथे केले. (Dedication is the Lions Club)
प्रांतपाल भरत बलघट यांनी लायन्स क्लब ऑफ नागपूर शाखेला नुकतीच भेट दिली. हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट येथे रविवारी या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लाॅयन्स क्लबच्या रीजन चेअरपर्सन डॉ. किरण मोहता(Dr. Kiran-Mohta) व झोन चेअरपर्सन नितीन वर्मा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रांतपालांच्या उपस्थितीत लॉयन्स क्लब ऑफ नागपूरच्या कार्यकारिणीची बैठक व आमसभेचेही आयोजन या निमित्ताने करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष निधीश सावरकर,(Nidish-Savarkar, ) सचिव गुरसिमरन कौर, (Secretary-Gursimran-Kaur)कोषाध्यक्ष रवी किशनपुरिया यावेळी मंचावर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुनील कुहीकर यांनी केलेले ध्वजवंदन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सचिव गुरसिमरन कौर यांनी मागील वर्षभरात झालेल्या विविध कार्यक्रमांचा, तर कोषाध्यक्ष रवी किशनपुरिया यांनी आर्थिक विषयांचा आढावा सादर केला.
क्लबचे ज्येष्ठ सदस्य राजेश जिंदल, रमेश जसोरे, विजय फरकासे, रवींदर खुराणा, उमेश महतो, सचिन अग्रवाल, किशोर भैय्या यांचा यावेळी प्रांतपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुरुवातीला अध्यक्ष निधीश सावरकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्लबच्या मागील वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली.
विजय फरकासे, पिंकी खापेकर, सागर शिवहरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. रजनीश जैन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश जिंदल, विनोद गुप्ता यांनी कार्यक्रमाचे संचालन, तर सचिवांनी आभार प्रदर्शन केले. जयंतीभाई पुनामिया, प्रवीण भल्ला, अनिल मॅथ्यू, महिंद्रसिंह मान,(Mahindrasingh-Maan) मनीषा ठाकर, (Manisha-Thacker,)रुपेश मोहता आदी पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.