अकोला मतदार संघ : कोला बुलढाणा वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदार संघात सलग तीन वेळा विजय मिळविणारे गोपीकिसन बाजोरिया यांचा पराभव
अकोला : अकोला बुलढाणा वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदार संघात सलग तीन वेळा विजय मिळविणारे गोपीकिसन बाजोरिया यांचा पराभव करण्याचा विक्रम भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी प्रस्थापित केला.
या मतदारसंघात आतापर्यंत भाजपची भूमिका फक्त शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून होती. परंतु आज भाजपने आपला उमेदवार या मतदारसंघात विजयी करून या मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
अकोला मतदार संघ : भारतीय जनता पार्टी चे वसंत खंडेलवाल यांना एकूण 443 मते मिळाली तर
महा विकास आघाडीचे गोपीकिसन बाजोरिया यांना 334 मते मिळाली 109 मतांनी वसंत खंडेलवाल यांनी
अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद मतदार संघावर विजय प्रस्थापित केला आहे
यावेळी भाजपाचे उमेदवार विजयी उमेदवार वसंत खंडेलवाल यांना निवडणूक निरीक्षक दिलीप पांढरपट्टे
व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले .