Asha-Bhosle : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra-Fadnavis)यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन
मुंबई : ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालय (Beach-Candy-Hospital) येथे निधन झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra-Fadnavis) यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. (Asha-Bhosle)

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार,(Ashish-Shelar) आमदार सुनील शिंदे,(Sunil-Shinde) आमदार प्रसाद लाड(Prasad-Lad) यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली.