Anantrao-Thopte : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. अनंतराव थोपटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
काँग्रेस पक्षाच्या विचारांशी अखंड निष्ठा राखत त्यांनी जनसेवा, सहकार आणि विकासाचा आदर्श निर्माण केला. पुणे जिल्ह्यात काँग्रेसची मुळे अधिक भक्कम करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. सहा वेळा आमदार आणि अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. (Anantrao-Thopte)
त्यांच्या नेतृत्वाने असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांना दिशा दिली. साधी राहणी, जनतेशी असलेली जवळीक आणि पक्षसंघटनेप्रती असलेली निस्सीम बांधिलकी यामुळे ते काँग्रेस परिवारातील आदरणीय नेतृत्व म्हणून कायम स्मरणात राहतील.
स्व. अनंतराव थोपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण काँग्रेस परिवार सहभागी असून, या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.