मंत्री सुभाष देसाई : मराठी भाषा विभागाच्यावतीने ‘अभिजात मराठी दालन’ उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे याची माहिती व ‘अभिजात मराठी’ची ऐश्वर्य गाथा या दालनाच्या माध्यमातून जगासमोर पोहचणार आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा व उद्योग मंत्री देसाई यांनी ‘अभिजात मराठी दालना’चे उद्घाटन प्रसंगी केले आहे.