PM Modi Baramati Visit: 3 नोव्हेंबरला मोदी बारामतीत; शरद पवारांच्या निमंत्रणावरून विद्या प्रतिष्ठानला भेट

PM Modi Baramati Visit : राजकारणाबाहेरची मैत्री! पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला शरद पवारांच्या निमंत्रणावरून बारामती येथील विद्या प्रतिष्ठानला भेट देणार. ‘गौतम बुद्धांच्या 4 टन वजनाच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण; महायुतीचे सर्व प्रमुख नेते

अन् राज्यपाल व्यासपीठावर राहणार उपस्थित’

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील राजकीय मतभेद आणि

वेगळी विचारधारा सर्वश्रुत असली, तरी राजकारणापलीकडचे त्यांचे सलोख्याचे व आपुलकीचे नाते पुन्हा एकदा देशासमोर येणार

आहे. शरद पवार यांनी दिलेल्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 3 नोव्हेंबर रोजी बारामती

दौऱ्यावर येत आहेत. बारामतीतील नामांकित ‘विद्या प्रतिष्ठान’ संस्थेत आयोजित विशेष कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार

असल्याची अधिकृत माहिती खुद्द शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘4 टन वजनाच्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे होणार अनावरण'(PM Modi Baramati Visit)

पत्रकार परिषदेत माहिती देताना शरद पवार म्हणाले की, “मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामती भेटीचे निमंत्रण दिले होते.

कालच पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान

मोदी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानला भेट देतील. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात भगवान गौतम बुद्ध यांचा 4 टन वजनाचा भव्य

पुतळा उभारण्यात आला असून, पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण पार पडणार आहे.”

‘महापुरुषांच्या तैलचित्रांचे अनावरण; ऑक्सफर्डच्या प्रमुखांसह दिग्गजांची उपस्थिती’

या ऐतिहासिक सोहळ्याचे स्वरूप अत्यंत व्यापक असणार आहे. पुतळ्याच्या सभोवताली महापुरुषांची आणि प्रेरणादायी

व्यक्तिमत्त्वांची तैलचित्रे (Paintings) बसवण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री

यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांच्या तैलचित्रांचा समावेश आहे.

‘राजकारणापलीकडचे ऋणानुबंध'(PM Modi Baramati Visit)

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेकदा तीव्र राजकीय वाद-प्रतिवाद पाहायला मिळतात. परंतु, देशाच्या आणि

राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार नेहमीच दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतात. पंतप्रधान मोदी यांनीही अनेकदा

सार्वजनिक व्यासपीठांवरून शरद पवारांबद्दलचा अनादर बाजूला ठेवत त्यांच्या राजकीय अनुभवाचे कौतुक केले आहे.

आता थेट बारामतीत शरद पवारांच्या संस्थेत पंतप्रधान मोदी हजेरी लावणार असल्याने या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे आणि

राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

Social Media