Gig-Workers-Justice-Campaign : मुंबई युवक काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Gig-Workers-Justice-Campaign : मुंबई युवक काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न “गिग वर्कर्स न्याय अभियान” पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली गांधी भवन, कुलाबा येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

“गिग वर्कर्स न्याय अभियान” पुस्तिकेचे प्रकाशन (Gig-Workers-Justice-Campaign)

या प्रशिक्षण सत्रासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून मुंबई काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी असद उस्मानी उपस्थित होते. त्यांनी SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देत, मतदार यादी पुनरिक्षणातील तांत्रिक बाबी,(technical-matters) अर्ज प्रक्रिया, आक्षेप नोंदविण्याच्या पद्धती तसेच पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन,(Zeenat-Sabreen,) युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर, (Tejas Chandurkar,) जिल्हाध्यक्ष प्रज्ञा धवले,(Pragya dhavale) फरहान मन्सुरी,(Farhan Mansuri,) शेखर जगताप, शिव जतन यादव, उत्तर-पश्चिम मुंबईचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल समद शाह (Abdul-Samad-Shah)तसेच प्रदेश सरचिटणीस मितेश सोनकर, अमनदीप सैनी, आसिफ खान आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या SIR मोहिमेच्या आधी ज्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली, त्या ठिकाणी लाखो मतदारांची नावे वगळली गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये, यासाठी युवक काँग्रेसने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांना सुसज्ज करून प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, लोकशाहीने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, मतदार यादीतून नाव वगळले जाणे हा नागरिकांच्या हक्कांवर आघात आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोरपणा राखण्याची मागणी करण्यात आली. तसेच मुंबईत SIR प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत युवक काँग्रेसच्या वतीने मतदारांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन व आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी “गिग वर्कर्स न्याय अभियान” या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गिग इकॉनॉमीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे झीनत शबरीन म्हणाल्या..

Social Media