पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती – मंत्री पंकजा मुंडे

Animal-Husbandry-Pankaja-Munde : पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : पशुसंवर्धन विभागातील नवीन आकृतीबंध ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर झाल्यामुळे काही संवर्गांतील पदसंख्या वाढली आहे. पदभरतीची प्रक्रिया गतीने सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात भरती प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja-Munde) यांनी  विधानपरिषदेत व्यक्त केला. (Animal-Husbandry-Pankaja-Munde)

विधानपरिषद सदस्य संजय खोडके (Sanjay-Khodke) यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, वाढीव पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) (MPSC) सोबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार 25 एप्रिल 2025 रोजी एलडीओ (पशुवैद्यकीय विकास अधिकारी) (Veterinary Development Officer) पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तसेच 12 ऑगस्ट रोजी वर्ग-एक दर्जाच्या सहा सहाय्यक आयुक्तपदांची जाहिरातही काढण्यात आली आहे.

परीक्षेसाठी पेपर सेटिंग प्रक्रियेसाठी तज्ज्ञ अधिकारी व प्राध्यापकांची नियुक्ती आवश्यक असून पेपर सेटिंगचे काम पूर्ण होताच परीक्षा घेण्यात येईल, असेही मंत्री मुंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर, एमपीएससीकडूनही (MPSC) भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुपर्यवेक्षकांची पदे जिल्हा परिषदेमार्फत (Zilla Parishad) भरण्यात येणार असून त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा झाली आहे. नवीन आकृतीबंधानुसार वाढलेल्या पदांची भरती अपरिहार्य आहे. त्यानुसार सर्व प्रक्रिया सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात पदभरती पूर्ण होईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

Social Media