National-Liberal-Club : महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचा वेल्स अभ्यास दौरा यशस्वी; आमदारांना विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी अभ्यास दौरा मार्गदर्शक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam-Gorhe)
मुंबई : राष्ट्रकुल संसद परिषद (CPA) आणि वेल्स विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण झाला. या दौऱ्यात सहभागी सदस्यांना त्यांचे प्रमाणपत्र नॅशनल लिबरल क्लब येथे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला CPA चे उपसचिव जनरल जार्विस मटिया, जोनाथन ग्रे, अध्यक्ष, राष्ट्रकुल नेतृत्व संस्था .आयन बॅसेट,जागतिक नातेसंबंध , युडब्लुएसटीडी , ईडब्ल्यूएसटीडी चे प्रो. जेरेमी स्मिथ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन चैतन्य मारपकवार यांनी केले होते.
सहभागी सदस्यांना सर्टिफिकेटचे वितरण (National-Liberal-Club)
विधानपरिषद सभापती राम शिंदे व ऊपसभापती नीलम गोर्हे यांची या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. यासमारंभात मंत्री आदिती तटकरे, आमदार बाबासाहेब देशमुख, विश्वजीत कदम, नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम पाचपुते, विक्रांत पाटील, सुमित वानखेडे, मनीषा कायंदे, निरंजन डावखरे, वरुण सरदेसाई, परिणय फुके, विक्रम काळे आदी विधिमंडळ सदस्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभारंभ विचार (ओपनिंग रिमार्क ) केले. त्या म्हणाल्या, “विधिमंडळाचे दैनंदिन कामकाज करताना जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविला जातो. त्यामागे सदस्यांची पार्श्वभूमी असते. परंतु जागतिक दृष्टिकोन वाढवणे आणि विविध प्रश्नांसाठी व्यासपीठ मिळणे यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात सर्व सदस्यांचा शंभर टक्के सहभाग होता.
वेल्स अभ्यास दौर्यामुळे विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी होण्यास निश्चितच मदत होईल.”
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “येणाऱ्या काळात राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या च्या वतीने असे उपक्रम राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविले जावेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(Devendra-Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath-Shinde) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे सहकार्य लाभले. तसेच सांस्कृतिक मंत्री आणि राष्ट्रकुल संसदिय मंडळ खजिनदार ना. आशिष शेलार यांचेही विशेष सहकार्य मिळाले.”
सहभागी आमदारांनी या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवांचा अहवाल तयार करून विधिमंडळ कार्यालयात सादर करावा, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले. यामुळे भविष्यातील अशा दौर्यांमध्ये सुधारणा करणे शक्य होईल.
हा दौरा शाश्वत विकासासाठी नेतृत्व, जागतिक नागरिकत्व आणि संसदीय कार्यपद्धती यासंदर्भात ज्ञानवृद्धी करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. सदस्यांनी वेल्श संसद यांसह विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि अनुभव घेतले.