Free castes and nomadic tribes : प्रदेश काँग्रेसच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके (Adv. Pallavi Renke) यांची नियुक्ती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले असून काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan sapakal) यांच्या आदेशावरून ॲड. पल्लवी रेणके (Adv. Pallavi Renke) यांची विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Free castes and nomadic tribes)
महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किमान ११% आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या हेतूने समाजातील या अतिदुर्लक्षित व वंचित समाज घटकाला न्याय मिळण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्याच्या निर्मितीपासूनच या समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देऊ केले आहे.
परंतु कडकलक्ष्मी, वैदू, गोंधळी, जोशी, वासुदेव, बहुरूपी, भराडी, डोंबारी, टकारी, रामोशी, लमाण या व अश्या सुमारे ४० जमाती आजही त्यांच्या पारंपरिक भटकंती व व्यवसायामुळे संघटित झालेल्या नाहीत. तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलेल्या नाहीत. अशा विखुरलेल्या व वंचित समुदायास संघटित करण्याचा निश्चय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे.
या कामाचे महत्त्व जाणून काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan sapakal) यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाला बळकटी देण्याचे ठरविले आहे.
हेही वाचा : मेट्रो स्लॅबच्या दुर्घटनेची जबाबदारी तथाकथीत विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी.