Organization creation process : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan sapakal)यांच्यासह वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष यांची काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan sapakal) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला प्रांताध्य हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच ‘संघटन सृजन प्रक्रिया’ या विषयावर काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय वॅार रूमचे प्रमुख खा. शशिकांत सेंथिल मार्गदर्शन करणार आहेत. (Organization creation process)
तर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर हे ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर हे ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत,अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.