कोकण-रेल्वे : चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर मंगळवारी प्रथमच सावंतवाडी दिवा पॅसेंजर गणपती स्पेशल ही गाडी थांबवण्यात आली. या गाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या उपस्थितीत खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने शानदार स्वागत करण्यात आले. संजना सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर थांबलेल्या पहिल्या ट्रेनचे स्वागत करण्यात आले .संघर्ष समितीचे नासीर काझी यांनी ट्रेनला पुष्पहार अर्पण केला तर यावेळी ट्रेनचे मोटरमन यांचेदेखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेने खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कार्यन्वित केल्याने गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे .