अप्पर वर्धा धरणाचे दोन दरवाजे उघडले…

अप्पर वर्धा धरण : अमरावती जिल्ह्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या अप्पर वर्धा धरणात जलसाठ्यात वाढ झाली आहे.अप्पर वर्धा धरणाची सप्टेंबर महिन्यातील पाणी साठवण क्षमता 342.05 इतकी आहे. मात्र आजघडीला धरणात 342.03 मिटर जलसाठा असून पाण्याची आवक सुरु आहे. पावसाची स्तिथी बघता काल सायंकाळी धरणाचे दोन दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यातून 16 घनमीटर प्रति शेकंदने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.प्रशासनाचे वतीने नदी काठच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Social Media