UPI व्यवहारांवर आयकर विभागाची नजर! दररोज 200, 300 किंवा 500 रुपयांचे व्यवहारही तपासले जातात

UPI-transactions : आयकर विभागाने करचुकवेगिरी रोखण्यासाठी आता अधिक कठोर पाऊले उचलली आहेत. विभाग डिजिटल आणि प्रत्यक्ष व्यवहारांवर बारीक नजर ठेवत आहे. तुमच्या उत्पन्नात आणि बँक खात्यातील व्यवहारात तफावत आढळल्यास, तुम्हाला नोटीस मिळू शकते. तुम्ही UPI द्वारे केलेले छोटे व्यवहारसुद्धा रेकॉर्ड केले जातात. त्यामुळे, आयकर विभाग अशा लहान व्यवहारांवर लक्ष का ठेवतो, हा प्रश्न आहे.

आयकर विभाग लहान व्यवहारांवरही लक्ष ठेवतो(UPI-transactions).

डिजिटल युगात UPI व्यवहार सामान्य झाले असले तरी आयकर विभाग आता काही विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. दररोज 200, 300 किंवा 500 रुपयांचे व्यवहार करणाऱ्यांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.

कर विभाग कसा पकडतो?(UPI-transactions)

दररोजचा आयकर हिशोब महिना आणि वर्षात एकत्रितपणे केला जातो. NPCI आणि बँकेच्या माध्यमातून होणारे UPI (उदा. पेटीएम, Google पे) आणि बँक खात्यांचे व्यवहार आयकर विभागाकडे नोंदवले जातात. खात्यातून नियमितपणे एकाच पद्धतीने व्यवहार झाल्यास, पैशाचा स्रोत आणि कारण तपासले जाते.

उत्पन्नाची माहिती देणे आवश्यक

समजा, तुम्ही दररोज UPI द्वारे ₹300 चा व्यवहार करत असाल, किंवा तुम्हाला UPI द्वारे दररोज ₹300 मिळत असतील, तर ती रक्कम महिन्याला ₹9,000 होते आणि वर्षाला ₹1 लाखांपेक्षा जास्त होते. जर हे पैसे एखाद्या सेवेच्या बदल्यात मिळत किंवा दिले जात असतील, तर ते उत्पन्न मानले जाईल. अशा परिस्थितीत, तुमचा पगार आयकर नियमांनुसार कर स्लॅबमध्ये येत असेल, तर आयकर भरताना तुम्हाला या उत्पन्नाची माहिती देणे आवश्यक आहे.

जर तुम्ही फक्त घरगुती खर्चासाठी UPI वापरत असाल आणि तुमचे उत्पन्न करपात्र नसेल, तर काळजी करू नका. पण, सेवा देऊन पैसे घेत असाल, तर ते उत्पन्न लपवू नका; डिजिटल पेमेंट करताना कर नियमांचे पालन करा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

यासह, आयकर विभाग तुमच्या बँक बचतीचे परीक्षण करतो. आर्थिक वर्षात तुम्ही तुमच्या बँक खात्यात 10 लाख किंवा त्याहून अधिकची रोकड जमा केल्यास, मग ती रक्कम एक किंवा अनेक खात्यांमध्ये असली तरी, तुम्हाला आयकर विभागाला याची माहिती देणे आवश्यक आहे. माहिती लपविल्यास आयकर नोटीस येऊ शकते.

या व्यतिरिक्त, आयकर विभाग(Income Tax Department) तुमच्या बँक बचतीचे परीक्षण करतो. आर्थिक वर्षात तुम्ही तुमच्या बँक खात्यात (एक किंवा अनेक खात्यांमध्ये) रु. 10 लाख किंवा अधिकची  रक्कम जमा केल्यास, तुम्हाला आयकर विभागाला याची माहिती देणे आवश्यक आहे. माहिती लपविल्यास, तुम्हाला आयकर नोटीस येऊ शकते.

🔍 या  प्रकारच्या व्यवहारांवर विभागाची नजर असते:

  1. व्यवसायिक व्यवहार – जर तुम्ही UPI द्वारे नियमितपणे व्यवसायासाठी पैसे स्वीकारत असाल, तर हे व्यवहार कर विभागाच्या रडारवर येतात.
  2. मोठ्या रकमेचे व्यवहार – एका दिवसात ₹50,000 पेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाल्यास ती ‘इतर स्रोतांमधून मिळालेली उत्पन्न’ म्हणून करपात्र ठरू शकते.
  3. गिफ्ट स्वरूपातील व्यवहार – मित्र किंवा नातेवाईकांकडून मिळालेली रक्कम ₹50,000 पेक्षा जास्त असेल, तर ती कराच्या कक्षेत येते.
  4. ई-वॉलेट वापरून व्यवहार – PhonePe, Paytm, Amazon Wallet

Social Media