Tulsi-Turmeric-Ginger-decoction : पावसाळा — निसर्गाचा एक जादूई ऋतू, पाऊस पडला की उष्णतेपासून हैराण झाल्यानंतर थंडगार पावसाळी वातावरणाने हुरहुरुन जाणारे आपण आनंद घेत असतो..मात्र दोन तीन महिने सलग येणाऱ्या पावसात आपली तारांबळ देखील उडते आणि याच दगदगीत आजारपण उद्भवतात त्यामुळे आधीच आपली काळजी घेतली तर या सर्व गोष्टी टाळता येउ शकतात.पावसाळा म्हणजे निसर्गाची एक सुंदर कविता असते, पण त्याचबरोबर आपली काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
☔️ पावसाळ्यात घ्यावयाची काही खास काळजी:
- पाण्यात भिजलेले कपडे लगेच बदला – सर्दी, ताप टाळण्यासाठी.
- उकळलेलं पाणी प्या – पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी.
- पावसात भिजल्यावर गरम चहा किंवा सूप घ्या – शरीराला उष्णता मिळते.
- छत्री किंवा रेनकोट नेहमी जवळ ठेवा – अचानक येणाऱ्या पावसासाठी.
- पायात गम बूट वापरा – चिखल आणि संसर्गापासून संरक्षण.
- डासांपासून सावध रहा – डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून बचाव.
आणि हो, पावसातल्या निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायला विसरू नका! मात्र स्वत:ची काळजी घेताना काय करायला हवे हे थोडक्यात जाणून घ्या
तुळस, हळद आणि आले यांचा काढा हा आयुर्वेदात एक शक्तिशाली नैसर्गिक पेय मानला जातो
या तिघांच्या संयोजनातून मिळणारे फायदे शरीर, मन आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी अत्यंत उपयुक्त .
तुळस + हळद + आले काढा पिण्याचे फायदे (Tulsi-Turmeric-Ginger-decoction)
रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Immunity Booster)
-तुळस शरीराला बळकटी देते
-हळद शरीरातील सूज व विषारी घटक कमी करते
-आले संक्रमणांपासून संरक्षण करते
सर्दी, खोकला आणि ताप यावर आराम
-या काढ्यामुळे छातीत जमा झालेला कफ वितळतो
-घसा खवखवणे आणि गळ्याचे इन्फेक्शन कमी होते
-विषाणूजन्य तापांमध्येही उपयोगी
पचनतंत्र सुधारते
-आले आणि हळद पचनास चालना देतात
-गॅस, अपचन, पोटदुखी यावर फायदेशीर
-चहा ऐवजी हा काढा पिल्यास पचन क्रिया सुधारते
डिटॉक्सिफिकेशन (शरीर शुद्धी)
-हळद आणि आले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात
-यकृत (liver) आणि मूत्रवहिनीसुद्धा शुद्ध राहते
मानसिक शांतता आणि तणाव कमी करतो
-तुळस आणि आले दोघेही नैसर्गिक शांततादायक घटक आहेत
-मन शांत राहते, झोप चांगली लागते
काढा बनवण्याची सोपी पद्धत:(Tulsi-Turmeric-Ginger-decoction)
1 ग्लास पाणी उकळा
त्यात 5-7 तुळशीची पाने, 1 छोटा चमचा हळद, आणि 1 चमचा किसलेले आले टाका
5-7 मिनिटे उकळा
गाळून गरमच प्या (हवे असल्यास मध घालू शकता – गरम काढा थोडा थंड झाल्यावरच
रोज एकदा सकाळी किंवा संध्याकाळी प्यावा
स्मार्ट हेल्थ टिप
या काढ्यात तुम्ही हिवाळ्यात दालचिनी, मिरीसुद्धा घालून त्याची प्रतिकारशक्ती आणखी वाढवू शकता!