Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, 25% टॅरिफनंतर 6 कंपन्यांवर घातली बंदी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी भारतावर २५% आयात टॅरिफ(Tariff) लादल्यानंतर आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. इराणसोबत व्यापार केल्याच्या आरोपावरून भारतातील सहा कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ईरान आणि रशिया यांच्यासोबत पेट्रोकेमिकल व्यवहार करणाऱ्या 6 भारतीय कंपन्यांवर थेट बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली असून यामुळे भारतातील पेट्रोकेमिकल(Petrochemical) उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने इराणसोबत तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या व्यापारात सहभागी असल्याबद्दल 6 भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे हे पाऊल कमाल दबाव धोरणाचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, कार्यकारी आदेश 13846 अंतर्गत 6 भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे इराणी तेल किंवा पेट्रोकेमिकल्स खरेदी करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोणत्याही देशाला किंवा व्यक्तीला अमेरिकेसोबत व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अमेरिकेने भारतातील कांचन पॉलिमर्स, अल्केमिकल सोल्युशन्स, रमणिकलाल एस गोसालिया अँड कंपनी, ज्युपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड आणि पर्सिस्टंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेडवरया कंपन्यांवर बंदी घातली आहे.
अमेरिकेच्या या कारवायांमुळे भारत-अमेरिका व्यापारसंबंधांवर दबाव येण्याची शक्यता आहे. भारतासाठी अमेरिका हा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार आहे आणि अशा प्रकारच्या थेट बंदीमुळे भविष्यातील गुंतवणूक व आयात-निर्यात संबंधांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कंपन्या(Tariff):
- कांचन पॉलिमर्स
- अल्केमिकल सोल्युशन्स
- रमणिकलाल एस गोसालिया अँड कंपनी
- ज्युपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड
- ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड
- पर्सिस्टंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड
निर्बंधांचे कारण(Tariff):
या कंपन्यांनी इराणमधून मोठ्या प्रमाणात पेट्रोकेमिकल उत्पादने खरेदी केल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल इराणच्या आर्थिक व्यवहारांवर दबाव टाकण्यासाठी उचलले असून, कार्यकारी आदेश १३८४६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
जागतिक परिणाम: या निर्णयामुळे भारतासह तुर्की, इंडोनेशिया आणि UAE मधील कंपन्यांवरही परिणाम झाला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल कराराची घोषणा करत भारताला भविष्यात पाकिस्तानकडून तेल खरेदी करावी लागेल, असेही सूचित केले.
राजकीय विश्लेषण: या घडामोडीमुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून, जागतिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.