Sushil-Kumar-Shinde : शिवसेना शिंदेचे खा. मिलींद देवराच्या खोटारडेपणाला प्रदेश काँग्रेसचे सणसणीत प्रत्युत्तर
लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान यालाही काही सीमा असते म्हणतात, पण मिलिंद देवरांनी ही सीमा कधीच ओलांडली आहे.
मिलिंद देवरांच्या वडिलांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे (Praniti-Shinde)आणि प्रदेश काँग्रेसचे अनेक जबाबदार पदाधिका-यांनी स्वतः जाऊन आशाताई भोसले (Ashatai Bhosale)यांना श्रद्धांजली वाहिली. ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, आणि माणुसकी आहे. (Sushil-Kumar-Shinde)
पण दुसरीकडे, शिंदे गटाच्या दारात उभं राहून खासदारकीची भीक मागणारा आणि ती मिळाल्यावर उपकार फेडण्यासाठी खोटे बोलून काँग्रेसवर चिखलफेक करून शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा (Milind-Dewar) हा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना ठरतो.
ज्या काँग्रेसने तुमच्या घराण्याला नाव, मान, ओळख आणि सत्तेची दारं उघडून दिली, त्याच काँग्रेसवर उगाचच भुंकत फिरणं — ही कृतघ्नतेची परिसीमा नाही तर काय?
मिलिंद देवरांनी (Milind-Dewar) आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा आणि मग काँग्रेसवर बोलावं. लाचारीतही एक मर्यादा असते, पण ती ओलांडून निर्लज्जपणाचा नवा विक्रम करण्याचं काम सध्या ते प्रामाणिकपणे करत आहेत.