Strong-protest-of-BJP : भंडारा जिल्ह्यात भाजपचा तीव्र निषेध
भंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, टीपू सुलतान यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदूंवर अत्याचार केले, सक्तीची धर्मांतरे घडवून आणली तसेच अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली. अशा अत्याचारी शासकाची तुलना लोककल्याणकारी व न्यायप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Strong-protest-of-BJP)
भाजपने म्हटले की, शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती-जमातींना एकत्र करून सर्व धर्म-पंथांना समान न्याय दिला आणि लोकाभिमुख शासनव्यवस्था उभी केली. त्यामुळे अशा महान राजाची तुलना टीपू सुलतानसारख्या शासकाशी करणे निंदनीय आहे.
भाजपने सपकाळ यांना तात्काळ जाहीर माफी मागण्याची मागणी केली असून, अन्यथा जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.
या निषेध सभेला जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, (Ashu-Gondane) जिल्हा महामंत्री मयुर बिसेन, (Mayur-Bisen)कल्याणी निखाडे, (Kalyani Nikhade)भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, नगरपरिषद अध्यक्ष मधुरा मदनकर,(Madhura-Madankar) चंद्रकला भोपे,(Chandrakala-Bhope) रुबी चड्ढा, चैतन्य उमाळकर, मंगेश वंजारी, संदीप मेश्राम, भगवान बावनकर, हरिचंद मडावी, प्रदीप साठवणे, शैलेश मेश्राम, अक्षय भिवगडे, निमिष डोकरीमारे, ललित जांभुळकर, शैलेश खरोले, तुषार हट्टेवार, प्रशांत श्रावणकर, शिव आजबले, दिलीप साठवणे, सचिन तिरपुडे, नंदू राजपुरोहित, वर्षा साकोरे, नितीन गायधने, डिम्मू शेख, बल्ली पटेल, रौनक उजवणे, ज्योती साबळे, प्रियाताई खरोले, प्रशांत निंबोळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.