पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका; करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांचे निधन

Sanjay-Kapur-passed-away :५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; बॉलिवूड आणि उद्योगविश्वात शोककळा

लंडन : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर(Karisma Kapoo) यांचे माजी पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर(Sanjay Kapur) यांचे गुरुवारी इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.

संजय कपूर (Sanjay Kapur)यांना खेळादरम्यान अचानक अस्वस्थ वाटले आणि ते जमिनीवर कोसळले. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची माहिती लेखक आणि अभिनेता सुहेल सेठ यांनी सोशल मीडियावर दिली.

‘सोना कॉमस्टार’चे चेअरमन

संजय कपूर हे ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सोना कॉमस्टार’चे चेअरमन होते. त्यांना पोलो खेळाची विशेष आवड होती आणि ते अनेक स्पर्धांमध्ये सक्रिय सहभागी होते.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ मध्ये लग्न झाले होते. मात्र, २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत – समायरा आणि कियान. घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी विवाह केला होता.

बॉलीवुड आणि व्यापारी वर्तुळात शोक (Sanjay-Kapur-passed-away)

संजय कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. करिश्मा कपूरकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

 

Business Tycoon Sanjay Kapur, Karisma Kapoor’s Ex-Husband, Dies at 53 After Heart Attack During Polo Match

Tributes pour in from Bollywood and business circles as the nation mourns the sudden loss

London – Industrialist Sanjay Kapur, ex-husband of Bollywood actress Karisma Kapoor, passed away at the age of 53 after suffering a heart attack during a polo match in England on June 12. The news has sent shockwaves through both the entertainment and corporate worlds.

Kapur, chairman of automotive giant Sona Comstar and recently appointed head of CII’s Northern Region, collapsed mid-game and could not be revived despite immediate medical attention. He was known for his passion for polo and motorsports, and his sudden demise has left friends and colleagues stunned.

He is survived by his wife Priya Sachdev and three children — two from his previous marriage with Karisma Kapoor, daughter Samaira and son Kiaan, and a son with Priya. Just hours before his passing, Kapur had expressed condolences on social media for the victims of the Ahmedabad plane crash, making his death all the more poignant.

Kapur and Karisma Kapoor were married in 2003 and officially divorced in 2016 after a prolonged legal battle. Despite their separation, they co-parented their children and remained in the public eye due to their high-profile lives.

Condolences have poured in from across industries, with author Suhel Seth confirming the news and calling it “a terrible loss.” Kapur’s legacy as a dynamic entrepreneur and devoted father continues to be remembered by those who knew him.

 

Social Media