एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

मुंबई : एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे.

सन. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना करण्यात आली. र.गो.सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तीनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे.  प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष असणारं आहेत.

महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची ” लोकवाहिनी ” असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Pratap Sarnaik has been appointed as the Chairman of the ST Corporation in his capacity as the Transport Minister. This appointment has been made in accordance with the rules and directives framed by the Maharashtra Government under Central legislation.


वारंवार तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

Social Media