Pakistan : पाकिस्तानात आक्रोश, रावळपिंडीत उपचार झाले 500% महाग; औषधं किती महाग?

Pakistan : विशेषत: मध्यपूर्वेतील युद्धामुळे पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. रावळपिंडीत औषधांच्या किमती 50% ते 500% पर्यंत वाढल्या आहेत, त्यामुळे सामान्य माणसाचे हाल झाले आहेत. मधुमेह, उच्चरक्तदाब, प्रतिजैविक यांसारखी जीवनावश्यक औषधे महाग झाली आहेत. इन्सुलिन इंजेक्शन आणि व्हिटॅमिन सप्लिमेंट्सच्या (Vitamin-supplements)किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

पाकिस्तान महागाई(Pakistan Inflation): मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे पाकिस्तानातील सामान्य माणसाची अवस्था वाईट आहे. सर्वसामान्यांशी संबंधित प्रत्येक वस्तू महाग होत आहे. आता औषधांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याची बातमी आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रावळपिंडीमधील फार्मास्युटिकल हब (Pharmaceutical Hub)(औषधांचे प्रमुख केंद्र) बोहोर मार्केटमध्ये औषधांच्या किमती 50 ते 500 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

कोणती औषधे महाग झाली आहेत? (Pakistan)

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब, अँटिबायोटिक्स, (antibiotics,)पोटाचे आजार, खोकला यासारख्या समस्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या अहवालातून ही महागाई समोर आली आहे. खुल्या बाजारात इन्सुलिन इंजेक्शन (Insulin-injection)उपकरणाची किंमत 2,200 पाकिस्तानी रुपये (PKR) वरून 4,720 PKR करण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात येत आहे.

यासोबतच अहवालात असेही सांगण्यात येत आहे की-

व्हिटॅमिन बी (Vitamin B) सप्लिमेंट्सची किंमत 500 PKR वरून 600 PKR झाली आहे.
त्याचप्रमाणे अपचन आणि ऍसिडिटीसाठी औषधाच्या पॅकेटची किंमत 530 PKR वरून 620 PKR झाली आहे.
पौष्टिक पूरक आणि व्हिटॅमिन टॅब्लेटच्या पॅकची किंमत 480 PKR वरून 510 PKR झाली आहे.
थायरॉईड औषधाची किंमत 85 PKR वरून 290 PKR झाली आहे.
सामान्य टायफॉइड उपचारांची किंमत 805 PKR वरून 930 PKR झाली आहे. रुग्ण अत्यावश्यक उपचारांपासून वंचित राहत असून, सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एलपीजीची किंमत ५ हजार रुपयांच्या वर गेली आहे

पाकिस्तान ब्युरो (Pakistan-Bureau)ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या सेन्सिटिव्ह प्राइस इंडेक्स (SPI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, 11.67 किलो LPG सिलिंडरची सरासरी किंमत 3,900 ते 5,135 रुपयांपर्यंत वाढली आहे, जी पूर्वी 3,150 ते 3,968 रुपयांदरम्यान होती. पाकिस्तानातील पंजाबमधील विविध शहरांमध्ये सिलिंडर सर्वाधिक महाग होत आहेत.

Social Media