नबाब मलिक : राष्ट्रवादीचे प्रवक्ता मलिक यांचा गंभीर आरोप
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार असून त्यांना लवकर जामीन मिळू नये म्हणून सक्तवसुली संचलनालयाकडून बातम्या पेरण्याचे काम केले जात आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ता नबाब मलिक यानी केला आहे. ऐंटालिया स्फोटक प्रकरणी वाझे यांचा मास्टर माईंड परमबीर सिंग असल्याचे समोर आले आहे मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन आय ए) न्यायालयात अतिरिक्त आरोप पत्र दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहे असा सवालही मलिक यानी माध्यमांशी बोलताना केल आहे.