Missing-Link : डोंगराळ भागात रस्त्यासाठी कुठलाही बोगदा खणला कि त्याच्या अंतर्गत भागास मजबुती येण्याकरिता कॉक्रीटचे(Concrete) जाडे लायनिंग केले जाते. हे लायनिंग(Lining) जर चुकीचे व निकृष्ट झाले तर पावसाळ्यात डोंगरातून झिरपणार्या पाण्याचा जोर वाढल्यास कॉक्रीटचे लायनिंग निकामी ठरू शकते. आज सोशिअल मिडीयावर दिसणाऱ्या फोटोतून हि बाब स्पष्ट होत आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ट प्रवक्ते व आर्कीटेकट् अनंत गाडगीळ (Anant-Gadgil) यांनी पत्रकात म्हंटले आहे.
दुसरे म्हणजे, युरोपियन स्टॅंडर्ड(European-Standard) प्रमाणे परदेशात अशे बोगदे-मार्ग तयार केल्यावर किमान १० ते १२ महिने त्याची चाचणी केली जाते, उणीवा दुरुस्त केल्या जातात व त्यानंतरच असे मार्ग जनतेसाठी खुले केले जातात. (Missing-Link)
परंतु युती सरकारने घिसाडघाईने केलेल्या उद्घाटनामुळे बांधकाम सुरक्षिततेच्या बाबींचे सर्वेक्षणच केले गेलेले दिसत नाही म्हणून आज हि परिस्थिती उद्भवली आहे. मुंबई-पुणे(Mumbai-Pune) नियमितपणे प्रवास करणारे टॅक्सीचालक मिसिंग लिंकचा वापर करण्यास घाबरत आहेत. संपूर्ण ९-१० किलोमीटर मध्ये नैसर्गिक (Natural) झीद्र (ओपेनिंग ) सोडता येईल असा मार्ग निवडायला पाहिजे होता. (Missing-Link)
याशिवाय अवघ्या ९-१० कि मी ला तब्बल १२ ते १३ ह्जार कोटी खर्च आल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने याची फोड करणारा तपशील जाहीर करावा म्हणजे जनतेच्या पैशाची हि लूट आहे याबाबतची खरी वस्तुथिती जनतेसमोर येईल अशी मागणी गाडगीळ यांनी केली आहे.
मिसिंग लिंक मधून केलेल्या आपल्या पहिल्याच प्रवासानंतर, आपण मंत्रालयातील वार्ताहर कक्षामधील काही पत्रकारांना हा धोकादायक असल्याचे भीती बोलूनही दाखविली होती. विकासाचे गुजरात मॉडेल(Gujarat-Model) नको असा टोमणाही गाड्गीळ यांनी लगावला आहे.