मिर्झापूर: द मूव्ही ‘वरुण फॉरएव्हर’ गाणे रिलीज; श्रेया घोषाल-रोमीच्या आवाजाची जादू..

मिर्झापूर – द-मुव्ही – गाणे : ‘मिर्झापूर: द मूव्ही’ मधील ‘वरुण फॉरएव्हर’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. श्रेया घोषाल आणि रोमी यांनी गायलेल्या या रिक्रिएट ट्रॅकमध्ये अली फजल,(Ali Fazal,) श्रिया पिळगावकर(Shriya-Pilgaonkar) आणि श्वेता त्रिपाठी (Shweta-Tripathi) दिसणार आहेत.

‘वरुण फॉरएव्हर’ गाणे रिलीज मिर्झापूर – द-मुव्ही – गाणे

मिर्झापूर’ फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. OTT वर धुमाकूळ घातल्यानंतर, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ आता मोठ्या पडद्यावर येत आहे, आणि त्यातील पहिले बहुप्रतिक्षित गाणे ‘वरुण फॉरएव्हर’ अधिकृतपणे रिलीज झाले आहे. 2020 च्या सुपरहिट मिर्झापूर सुफी गाणे ‘वरुण’ सूफी ट्रॅकची ही नवीन आवृत्ती चाहत्यांना जुन्या आठवणींमध्ये रमवून टाकत आहे.

निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेनुसार, ‘वरुण फॉरएव्हर’ हे प्रसिद्ध गायक श्रेया घोषाल (Shreya Ghoshal)आणि रोमी यांनी एकत्र गायले आहे. मूळ गाण्यातील सुफी आणि अध्यात्मिक अनुभूती कायम ठेवत नव्या आवृत्तीने एक नवी ऊर्जा जोडली आहे. हे गाणे प्रामुख्याने अली फजल (गुड्डू पंडित), श्रिया पिळगावकर (स्वीटी), जितेंद्र कुमार (Jitendra Kumar)आणि श्वेता त्रिपाठी (गोलू) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
श्रेया घोषाल-रोमीचा जादुई आवाज

हे आयकॉनिक गाणे पुन्हा एकदा संगीतकार आनंद भास्कर यांनी संगीतबद्ध केले आहे, तर त्याचे सुंदर बोल गिन्नी दिवाण यांनी लिहिले आहेत. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओच्या बॅनरखाली बनवलेले हे गाणे ‘एक्सेल म्युझिक’ या लेबलचे पहिले अल्बम रिलीज झाले आहे. प्रेक्षकांचे जुने भावनिक नाते जपत मोठ्या पडद्यासाठी याला भव्य स्वरूप देण्याचा निर्मात्यांचा उद्देश आहे. Mirzapur The Movie

पहा चित्रपटाचे नवीन गाणे-

OTT ते मोठ्या पडद्यापर्यंतचा एक अद्भुत प्रवास

2018 साली वेब सिरीज म्हणून सुरू झालेला ‘मिर्झापूर’चा प्रवास आता थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या दिशेने वळला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून त्याची कथा पुनीत कृष्णाने लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. मोठ्या पडद्यासाठी पूर्णपणे नवीन आणि स्फोटक कथानक तयार करण्यात आले आहे.

Social Media