Jiva-Mahale : “शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं”

Jiva-Mahale : “शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं”
Jiva-Mahale : तीन तास सात मिनिटांच्या चित्रपटात सलमान खानचा (Salman-Khan) केवळ दोन मिनिटांचा रोल आणि दोनच डायलॉग. तेही हृदयाला भिडणारे.. जीवा महालेच्या रूपात जेव्हा तो बडा सय्यदच्या मानेवर पट्टा ठेवतो आणि “शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं” म्हणतो, तसेच जेव्हा महाले छत्रपती शिवाजी महाराजांना “राज तुम्ही पुढं निघा” रावण तुम्ही पाडलाय आता लंका आम्ही जाळतो.. असं म्हटल्याबरोबर टाळ्या आणि शिट्ट्यांचा गडगडाट होतो.
सलमान खान भगवी वस्त्रं परिधान करून महालेच्या रूपात एंट्री करतो तेव्हा सर्वात जास्त टाळ्या मिळतात. सीन जसा हवा होता तसा शूट झाला नसला तरी, सलमान खानमुळे तो खटकत नाही.
रितेश देशमुख यांनी सांगितले की, सलमान खान (Salman-Khan)  त्यांच्या तीनही मराठी चित्रपटांमध्ये होता. या चित्रपटात रोल नसतानाही, सलमानने स्वतःहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली, कारण त्याला या चित्रपटात योगदान द्यायचे होते.असं रितेशने सांगितलं आणि इथेच सलमान खान(Salman-Khan) भाव खाऊन गेला.. जय शिवराय!
‘राजा शिवाजी’ चित्रपटाची निर्मिती जेनेलिया डिसूजा(Genelia-D’Souza) आणि सहनिर्मिती ज्योती देशपांडे (Jyoti-Deshpande)यांनी केली आहे. रितेश देशमुख (Ritesh-Deshmukh)यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारली आहे. संजय दत्त, (Sanjay-Dut) विद्या बालन, (Vidya-Balan) अभिषेक बच्चन,(Abhishek-Bachchan,) भाग्यश्री पटवर्धन,(Bhagyashree-Patwardhan) फरदीन खान यांच्यासह अनेक कलाकारांच्या यात भूमिका आहेत, तसेच सलमान खानचा कॅमिओ आहे.

Social Media