नाना… तुमची उणीव कायम जाणवत राहील.. ! – सुनिल तटकरे

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर : नाना… तुमची उणीव कायम जाणवत राहील.. ! – सुनिल तटकरे

मुंबई :  नाना… तुमची उणीव कायम जाणवत राहील.. ! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट नाना पाटेकर यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझे मित्र, ज्येष्ठ अभिनेते यांच्या निधनाची बातमी मनाला हेलावून टाकणारी आहे. नाना माझे केवळ जुने स्नेही नव्हते, तर आयुष्याच्या अनेक सुख-दुःखाच्याक्षणी सोबत असलेले, चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची थाप मारणारे आणि हक्काने चुका स्पष्टपणे दाखवून देणारे, माझे जिवलग मित्र होते असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

नानांसोबतच्या असंख्य आठवणी आज डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आहेत. निसर्गावर, पर्यावरणावर मनापासून प्रेम करणाऱ्या नानांचा दिलखुलास स्वभाव, स्पष्टवक्तेपणा, माणसांशी जोडून घेण्याची त्यांची सहजता आणि त्यांच्या मनातील संवेदनशील माणूस मला नेहमीच भावला अशा आठवणींना सुनिल तटकरे यांनी उजाळा दिला.

कलाक्षेत्रात त्यांनी आपल्या असामान्य अभिनयाने अढळ स्थान निर्माण केले. मात्र, माझ्यासाठी पडद्यावरचा महान कलाकार असण्यासोबतच मनाने मोठा आणि माणुसकी जपणारा नाना ही त्यांची ओळख अधिक जवळची होती. आज एक जिवलग मित्र हरपल्याची पोकळी मनात निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.तुमच्या आठवणी कायम मनात जिवंत राहतील अशा भावना व्यक्त करत सुनिल तटकरे यांनी नानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Social Media