Jana-Nayakan-Release-Date: सुपरस्टार थलपती विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही, हे येत्या काही दिवसांतच समोर येणार असलं तरी त्याच्या ‘जन नायकन’ सिनेमा संदर्भातही मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय(Thalapathy Vijay) याच्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेला ‘ जन नायकन ‘ हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही रिपोर्ट्सनुसार निर्माते हा चित्रपट जून २०२६ मध्ये प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत.
वाढदिवसाचे खास औचित्य (Jana-Nayakan-Release-Date)
मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते २२ जून २०२६ ही तारीख प्रदर्शनासाठी निश्चित करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २२ जून रोजी थलपती विजयचा वाढदिवस असतो. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या वाढदिवशीच त्याचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता येऊ शकतो.
थलपती विजयच्या बर्थडेच्या दिवशीच सिनेमा प्रदर्शित होण्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यामुळं चाहत्यांमध्ये आतापासूनच प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
सिनेमाच्या प्रदर्शनाला का झाला उशीर?
‘जन नायकन’ हा चित्रपट मुळात जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाचे (CBFC) प्रमाणपत्र आणि काही तांत्रिक कारणांमुळं चित्रपट प्रदर्शनास विलंब झाला. दरम्यानच्या काळात चित्रपटाचे काही भाग ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. मात्र, आता सर्व अडथळे पार करून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.
दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत
चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, दिग्दर्शक: एच. विनोथ (H. Vinoth) यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. विजय, (Vijay, )पूजा हेगडे, (Pooja Hegde) बॉबी देओल,(Bobby-Deol) प्रकाश राज (Prakash Raj) आणि ममिता बैजू (Mamita-Baiju)यांच्या सिनेमात भूमिका आहेत.तर अनिरुद्ध रविचंदर याचं संगीत आहे.
हा एक राजकीय ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून, विजयच्या राजकीय प्रवेशापूर्वीचा हा शेवटचा चित्रपट असल्यानं विशेष महत्त्व आहे. विजय सध्या आपल्या राजकीय जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असून, लवकरच तो निर्मात्यांशी चर्चा करून अधिकृत तारखेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
नायक होणार का मुख्यमंत्री?
दरम्यान, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या विजयच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाला काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतरही बहुमतासाठी पाच जागा कमी पडत आहेत. त्यातच आधी पाठिंबा देणाऱ्या आमदारांची यादी सादर करा, असा आदेश राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी ‘टीव्हीके’ प्रमुख विजय यांना दिल्यानं तमिळनाडूमध्ये बहुमताचा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांनी डावे तसंच ‘व्हीसीके’ या द्रमुकच्या मित्रपक्षांना साद दिली आहे. त्यामुळं थलपती विजय (Thalapathy Vijay) आता मुख्यमंत्री होणार का? याकडंही लक्ष लागलं आहे.