बिग बॉस मराठी विजेता जय दूधाणे फसवणूक प्रकरणात अटक

Jai-Dudhane-Fraud-Case : जय दुधाणे या आघाडीच्या फिटनेस प्रशिक्षक आणि मॉडेलला शनिवारी विमानतळावर अटक करण्यात आली.

मुंबई : बिग बॉस मराठीचा विजेता आणि अभिनेता जय दूधाणे याला ठाणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल ५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

‘स्प्लिट्सव्हिला 13’ आणि ‘बिग बॉस मराठी 3′(Bigg Boss Marathi 3) फेम जय दुधाणे(Jai-Dudhane), ज्याने सोशल मीडिया प्रभावकार हर्षला पाटीलसोबत नुकतेच लग्न केले, याला 4.61 कोटी रुपयांच्या रिअल इस्टेट घोटाळ्याप्रकरणी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी या फसवणूक प्रकरणाला दुजोरा दिला आहे. पीटीआयनुसार, एका निवृत्त अभियंत्याने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दुधाणे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी ठाण्यातून पाच व्यावसायिक दुकाने खरेदी करताना 4.61 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दुकाने बँकेकडे गहाण ठेवल्याची माहिती असून, याच प्रकरणी ही अटक झाली आहे. जय दुधाणे एक फिटनेस प्रशिक्षक आणि मॉडेल आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी पुष्टी केली की जय दुधाणे या आघाडीच्या फिटनेस प्रशिक्षक आणि मॉडेलला शनिवारी विमानतळावर अटक करण्यात आली.

फसवणूक प्रकरणी दुधाणे यांच्यावर गुन्हा दाखल(Jai-Dudhane-Fraud-Case)

फसवणूक प्रकरणी दुधाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ४.९५ कोटी रुपयांचा बनावट डिमांड ड्राफ्ट (DD)आणि बनावट बँक क्लिअरन्स लेटर वापरून फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकेने मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुधाणे व त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी सोशल मीडियाInfluencer हर्षला पाटीलसोबत लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी बोलताना जय म्हणाला, “माझ्या नावावर L.O.C. जारी आहे हे मला विमानतळावर समजले. माझ्याकडे पुरावे नाहीत, त्यामुळे या प्रकरणावर अधिक बोलणे योग्य नाही.”

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात दूधाणे याचे नाव समोर आले असून तपासाच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, जय दूधाणेने सर्व आरोप फेटाळले असून मी या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही” असे स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बिग बॉस मराठीतील विजयानंतर दूधाणेने अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती. आता या प्रकरणामुळे त्याच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील तपास ठाणे पोलिसांकडून सुरू असून लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

 

 

Social Media