दीड लाख सरकारी नोकर भरती

Govt-Servant-Recruitment : दीड लाख सरकारी नोकर भरती

सरकारी पदांच्या नियुक्तीबाबत सांगताना आनंद होतो, महायुती सरकार आल्यापासून 1 लाख 20 हजार 449 लोकांना नियुक्ती दिली आहे. अजून काही नियुक्तीपत्र शिल्लक आहेत, हा आकडा दीड लाख पर्यंत जाईल. (Govt-Servant-Recruitment)

आम्ही 75 हजार सांगितले होते, आता नव्याने भरतीचे सत्र सुरु करत आहोत. दिलेला शब्द पूर्ण करतोय, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गडचिरोलीत 2 लाख 68 हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. जल जमीन जंगलचे संवर्धन करून विकास करतोय. गडचिरोलीत 5 कोटी झाडे आपण लावणार आहोत.
काही ठिकाणी वृक्षतोड करावी लागतेय, त्यामुळे हा उपक्रम करतोय.

आजही गडचिरोलीत झालेल्या गुंतवणुकीत स्थानिकांनाच संधी दिली आहे. तिथे काम मिळालेले 90 टक्के लोक स्थानिक, आदिवासी आणि दलित आहेत. आजही गडचिरोलीमधील लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण तो यशस्वी होणार नाही. गडचिरोलीमधील स्थानिकांना सोबत घेऊन स्टील हब सिटी केली जाईल.

10 लाख कोटींच्या करारावर त्याठिकाणी प्राथमिक चर्चा झाली आहे. उद्योजक आता महाराष्ट्रात येऊन चर्चा करत आहेत, त्यातील काही करार भविष्यात होतील. सिंगापूर, जपान, युएई, स्पेन असे अनेक देश आहेत. स्कोडा, टेस्ला, टाटा सन्स, कोका कोला अशा अनेक कंपन्या आहेत. एआय, डाटा सेंटर, आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, शिक्षण, फिनटेक असे वेगवेगळे उद्योग आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागात ही गुंतवणूक आली आहे, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Social Media